भारीच की ! प्रचंड सवलत आणि कॅशबॅकसह खरेदी करा Realme 5G फोन, अप्रतिम डिस्प्ले आणि कॅमेरा

भारीच की ! प्रचंड सवलत आणि कॅशबॅकसह खरेदी करा Realme 5G फोन, अप्रतिम डिस्प्ले आणि कॅमेरा
HIGHLIGHTS

प्रचंड सवलत आणि कॅशबॅकसह Realme 5G फोन खरेदी करण्याची संधी

15 ते 20 हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये येणारा Realme 8s 5G स्मार्टफोन

फोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी Realme ची खास ऑफर आहेकंपनीच्या वेबसाइटवर, तुम्ही 15 ते 20 हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये येणारा पावरफुल स्मार्टफोन Realme 8s 5G उत्तम ऑफर्स आणि सवलतींसह खरेदी करू शकता. फोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. त्याच्या 6 GB  रॅम व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आणि 8 GB रॅम व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तुम्ही फोनचे दोन्ही मॉडेल्स 2 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. ही सवलत फक्त प्रीपेड ऑर्डरसाठी आहे.

हे सुद्धा वाचा : Jio च्या 'या' प्लॅनपुढे Airtel-Vi देखील फेल ! दररोज 3GB डेटा, कॉलिंग आणि Disney+ Hotstar फ्री

या व्यतिरिक्त, तुम्ही Realme 8s 5G खरेदी करताना ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1500 रुपयांपर्यंतची झटपट सूट देखील मिळू शकते. पेटीएम वॉलेट पेमेंटवर कंपनी वापरकर्त्यांना 1,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील देत आहे. हा फोन 64 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 33 वॉट फास्ट चार्जिंगसह येतो.

Realme 8s 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये, कंपनी 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच फुल HD + डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रीफ्रेश रेट आणि 600 nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90.5% आहे. रीअलमीचा हा फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे.

realme 8s 5g

प्रोसेसर म्हणून कंपनी त्यात MediaTek Dimension 810 5G चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ब्लॅक अँड व्हाइट पोर्ट्रेट लेन्स आणि मॅक्रो लेन्स देण्यात आले आहेत. तसेच, सेल्फीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले कॅमेरा पाहायला मिळेल. 

 साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी फोनमध्ये 5G, 4G, Wi-Fi, GPS आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo