6000mAh बॅटरी असलेल्या Realme 14T फोनची लाँच डेट Confirm! नव्या फोनमध्ये काय मिळेल विशेष?
Realme ने आतापर्यंत भारतात त्यांच्या 14 नंबर सिरीजअंतर्गत चार फोन आधीच सादर केले आहेत.
सिरीजअंतर्गत आता कंपनी नवा फोन Realme 14T 5G लाँच करणार आहे.
Realme 14T 5G चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेक्स पुढे आले आहेत.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने आतापर्यंत भारतात त्यांच्या 14 नंबर सिरीजअंतर्गत चार फोन सादर केले आहेत. या सिरीजअंतर्गत Realme 14x, Realme 14 Pro, Realme 14 Pro+ आणि 14 Pro Lite हे फोन्स समाविष्ट आहेत. आता कंपनी या सिरीज पाचवा मोबाईल फोन आणण्यास सज्ज झाली आहे. ब्रँडने घोषणा केली आहे की, ते या महिन्यात भारतात नवीन Realme 14T 5G फोन लाँच करणार आहेत. जाणून घेऊयात संपूर्ण तपशील-
SurveyAlso Read: Moto pad 60 Pro जबरदस्त टॅबलेट्स भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्वोत्तम फीचर्स
Realme 14T 5G ची भारतीय लाँच डेट
Realme 14T 5G फोन 25 एप्रिल रोजी भारतात लाँच होईल. कंपनी हा फोन एका व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे बाजारात लाँच करणार आहे. Realme 14T 5G ची किंमत आणि विक्री तपशील लाँच इव्हेंटच्या दिवशी दुपारी 12 वाजता उघड केले जातील. Realme 14T इंडिया लाँच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह सर्व ब्रँडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम करता येईल.
Dazzle with style! ✨
— realme (@realmeIndia) April 17, 2025
The #realme14T5G features a satin-inspired design—where elegance meets artistic luxury.
Launching on 25th April, 12PM.
Know more on https://t.co/HrgDJTI9vv and Flipkart.https://t.co/jK5th2CJz2 https://t.co/sfXdN9GksS pic.twitter.com/fEGRti9bq8
या Realme 5G फोनचे प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट Flipkart वर देखील लाईव्ह झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Realme 14T 5G सिल्कन ग्रीन, व्हायलेट ग्रेस आणि सॅटिन इंक या कलर ऑप्शन्समध्ये विकला जाईल.
Realme 14T 5G चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme 14T 5G च्या अपेक्षित फीचर्स आणि स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, आगामी Realme 5G फोन AMOLED स्क्रीनवर बनवला जाईल. हा पंच-होल स्टाईलचा फ्लॅट डिस्प्ले असेल. या स्क्रीनकडे पाहताना रात्रीच्या वेळी हा फोन वापरल्याने डोळ्यांना जास्त नुकसान होणार नाही. कंपनीने स्वतः सांगितले की, मोबाईलची जाडी फक्त 7.97 मिमी असेल. या मोबाईलला IP69 रेटिंग देण्यात आले आहे, जे पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.

पॉवर बॅकअपसाठी, Realme 14T 5G फोन बाजारात लाँच केला जाईल, जो 6,000mAh च्या मजबूत बॅटरीने सुसज्ज असेल. कंपनीचा दावा आहे की, पूर्ण चार्ज केल्यानंतर, हा फोन 17.2 तास सतत YouTube किंवा 12.5 तास Instagram प्ले करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. ही पॉवरफुल बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देखील दिले जाईल. मात्र, फोनचे योग्य फीचर्स Realme 14T 5G लाँच झाल्यावरच पुढे येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile