महिन्याच्या सुरुवातीला Realme 11 Pro 5G सिरीज भारतात लाँच करण्यात आली. या सिरीजमध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ 5G हे दोन स्मार्टफोन आहेत. त्यानंतर आज म्हणजेच 15 जूनला फ्लिपकार्टवर Realme 11 Pro+ 5G ची सेल सुरु झाली आहे. तर, दुसरा फोन Realme 11 Pro 5G ची पहिली सेल उद्या म्हणजेच 16 जूनला आहे. स्मार्टफोन खरेदीसाठी कुठे आणि कोणत्या ऑफर्ससह उपलब्ध आहे ? ते बघुयात –
Survey
✅ Thank you for completing the survey!
Realme 11 Pro+ 5G ची किंमत
Realme ने हा 5G फोन 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंट 27,999 रुपये सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. तर, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह टॉप व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे.
पहिल्या सेलमध्ये Realme 11 Pro+ 5G वर HDFC, ICICI आणि SBI बँक कार्डवर 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्कॉऊंट मिळेल. तसेच, या फोनसह एक्सचेंज ऑफरमध्ये 2000 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. हा स्मार्टफोन सनराईज बेज, एस्ट्रल ब्लॅक आणि ओएसिस ग्रीन या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.
Realme 11 Pro+ 5G
लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. प्रोसेसर म्हणून यात MediaTek Dimensity 7050 आहे. ज्यामध्ये, 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.
स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात SuperOIS सह 200MP प्रायमरी कॅमेरा, 8MP चा दुसरा आणि 2MP तिसरा कॅमेरा आहे. तर, 32MPचा सेल्फी कॅमेरा यात मिळणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये मून मोड देखील उपलब्ध आहे. कंपनीने 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile