HIGHLIGHTS
Poco X5 Pro 5G ची सेल आजपासून सुरु
फ्लिपकार्टवर भारी ऑफर्ससह हा फोन खरेदी करा.
6 GB रॅम / 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये
हँडसेट निर्माता Poco ने गेल्या आठवड्यात ग्राहकांसाठी आपला नवीन Poco मोबाईल फोन लाँच केला. आजपासून Poco X5 Pro 5G ची विक्री Flipkart वर सुरू होणार आहे. चला तर मग या Poco फोनची किंमत, फीचर्स आणि ऑफर्स जाणून घेऊयात…
Surveyहे सुद्धा वाचा : अगदी वैताग आणतात Smartphone चे कॉमन '5' प्रॉब्लम्स, येथे वाचा सोल्युशन्स…
पोको मोबाइलच्या 6 GB रॅम / 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. 8GB RAM / 256GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदा, अमेरिकन एक्सप्रेस आणि IDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 10 टक्के म्हणजेच 1000 रुपयांपर्यंत सवलतीचा लाभ मिळेल. HDFC आणि ICICI डेबिट-क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास 2 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो HDR10+ ला सपोर्ट करतो. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 वापरण्यात आला आहे. फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Adreno 642L GPU देण्यात आला आहे.
या Poco स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 108MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी-व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile