पॅनॅसोनिक P50 आयडल आणि P65 फ्लॅश स्मार्टफोन लाँच

HIGHLIGHTS

हे दोन्ही स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. त्याचबरोबर ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये १.३GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि १जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ८जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले आहे.

पॅनॅसोनिक P50 आयडल आणि P65 फ्लॅश स्मार्टफोन लाँच

मोबाईल निर्माता कंपनी पॅनॅसोनिकने आपल्या दोन नवीन स्मार्टफोन्स P50 आयडल आणि P65 फ्लॅशला भारतात लाँच केले आहे. पॅनॅसोनिक P50 आयडल आणि P65 फ्लॅशची किंमत क्रमश: ६,७९० आणि ८,२९० आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

ह्या दोन स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या दोन्ही फोनची बरेचशी वैशिष्ट्ये एकसारखीच आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. त्याचबरोबर हे दोन्ही स्मार्टफोन्स १.३GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि १जीबी रॅमने सुसज्ज आहेत. ह्या स्मार्टफोन्समध्ये ८जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-USB कार्डद्वारे ३२जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये LED फ्लॅशसोबत ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलाचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोन्समध्ये 3G, GPRS/एज, वायफाय८०२.११ B/G/N, GPS/ A-GPS, मायक्रो-USB आणि ब्लूटुथ कनेक्टिव्हीटी वैशिष्ट्ये दिली आहेत.

ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काही वैशिष्ट्ये एकमेकांपेक्षा थोडी वेगळीही आहेत, त्यातील एक म्हणजे, ह्या दोन्ही फोनच्या डिस्प्लेचा आकार. खरे पाहता, पॅनॅसोनिक P50 आयडलमध्ये ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन ७२०x१२८० पिक्सेल आहे. तर P65 फ्लॅशमध्ये ५.५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहेे, ज्याचे रिझोल्युशन ७२०x१२८० पिक्सेल आहे. तसेच ह्या दोन्ही स्मार्टफोनच्या बॅटरीमध्येही अंतर आहे, पॅनॅसोनिक P50 आयडल आणि पॅनॅसोनिक P65 फ्लॅश क्रमश: 2150mAh आणि 2910mAh बॅटरीसह सुसज्ज आहेत.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo