Oppo च्या नवीन फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंग, मिळेल पॉवरफुल प्रोसेसर

Oppo च्या नवीन फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंग, मिळेल पॉवरफुल प्रोसेसर
HIGHLIGHTS

Oppo Reno 9 सीरीज या महिन्याच्या शेवटी लाँच होण्याची शक्यता

सिरीजमध्ये Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro + असे तीन फोन असतील.

लीकनुसार कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 प्लस जनरल 1 चिपसेट प्रोसेसर देणार

कंपनी Oppo Reno 9 Series या महिन्याच्या अखेरीस लॉन्च करू शकते. Oppo Reno 9 सिरीजमध्ये Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro + असे तीन फोन असतील. असे देखील सांगितले जात आहे की, कंपनी Reno 9 मध्ये Snapdragon 778G आणि Reno 9 Pro मध्ये Dimensity 8200 प्रोसेसर देणार आहे. आता एक नवीन लीक आली आहे, ज्यामध्ये Reno 9 Pro+ च्या चिपसेटबद्दल माहिती देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : 155 रुपयांमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचा लाभ घ्या, संपूर्ण एक महिन्याच्या वैधतेसह उपलब्ध

लीकनुसार, कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 प्लस जनरल 1 चिपसेट प्रोसेसर म्हणून देऊ शकते. याशिवाय Oppo च्या या फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा मेन आणि 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पाहायला मिळतो.

Oppo Reno 9 Pro+ चे संभावित फीचर्स 

लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी या फोनमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच फुल एचडी + पंच-होल OLED डिस्प्ले देऊ शकते. फोनमध्ये ऑफर केलेल्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असण्याची शक्यता आहे. कंपनी या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 8 प्लस जनरल 1 चिपसेट देईल, अशी माहिती मिळाली आहे. त्याबरोबरच, हा फोन 4700mAh बॅटरी सह येईल. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनवर ऑफर केलेल्या इतर फीचर्समध्ये मेटॅलिक मिडल फ्रेम आणि IR ब्लास्टरचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की फोनच्या मागील बाजूस दिलेला कॅमेरा 1.56-इंचचा सोनी IMX890 सेन्सर आहे. कंपनी फोनमध्ये एनपीयू देखील देणार आहे, जो कमी प्रकाशातही उत्तम फोटो क्लिक करेल. तसेच, सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल, अशी माहिती मिळाली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo