चीनी स्मार्टफोन निर्माता Oppo चा Reno 8T 5G हा स्मार्टफोन देशात फेब्रुवारीमध्ये 29,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. ही त्याच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज या एकमेव व्हेरिएंटची किंमत आहे. हा स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक्स चेन क्रोमा वर अतिशय कमी किमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांकडे आहे. हा फोन क्रोमावर निम्म्याहून कमी किमतीत म्हणजेच 12,765 रुपयांना डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो.
IDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना 750 रुपयांपर्यंतची झटपट सूट देखील मिळू शकते. हे सनराइज गोल्ड आणि मिडनाईट ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल. मात्र लक्षात घ्या की, ही ऑफर तुम्हाला केवळ क्रोमावर बघायला मिळणार आहे. कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर आणि ई-कॉमर्स साइट Flipkart वर फक्त त्याची लाँच किंमत दृश्यमान आहे.
Oppo Reno 8T 5G
Oppo Reno 8T 5G मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल-HD+ कर्व OLED डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आणि 360 Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. हा 5G प्रोसेसर वेब ब्राउझ करणे, सोशल मीडिया वापरणे आणि हलके गेम खेळणे यासारखी दैनंदिन कामे हाताळण्यास सक्षम आहे.
Oppo Reno 8T 5G च्या ट्रिपल रियर कॅमेरा युनिटमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या स्मार्टफोनमध्ये फ्रंटला 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. त्याची 4,800 mAh बॅटरी 67 W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की त्याच्या फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे 45 मिनिटांपेक्षा कमी वेळात शून्य ते 100 टक्के चार्ज करता येतो.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile