Oppo Reno 8 सिरीज 18 जुलै रोजी भारतात होणार लाँच, कॅमेरा-बॅटरी-प्रोसेसर सर्व अतिशय पावरफुल

Oppo Reno 8 सिरीज 18 जुलै रोजी भारतात होणार लाँच, कॅमेरा-बॅटरी-प्रोसेसर सर्व अतिशय पावरफुल
HIGHLIGHTS

Oppo Reno 8 सिरीज भारतात लवकरच होणार लाँच

सिरीजमधील स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 29,990 रुपये

फोनमध्ये 80W सुपर फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500mAh बॅटरी

OPPO ने शेवटी Reno 8 सिरीजची भारतात लाँच डेट जाहीर केली आहे. हा फोन नवीनतम रेनो मॉडेल आहे आणि हा Oppo Reno 7 सिरीजचा सक्सेसर आहे. OPPO Reno 8 सिरीज 18 जुलै रोजी संध्याकाळी 6:00 वाजता देशात लाँच होईल. Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro चे लाँच इव्हेंट ऑनलाइन आयोजित केले जावे जे कंपनीच्या YouTube चॅनेलवर लाईव्ह-स्ट्रीम केले जाईल. लाइनअपमध्ये तीन मॉडेल समाविष्ट आहेत: Oppo Reno 8, Oppo Reno 8 Pro आणि Oppo Reno 8 Pro Plus. फोन आधीच लॉन्च केले गेले असल्याने, त्यामुळे त्यांची किंमत आणि फीचर्सबाबत माहिती सांगता येईल. 

हे सुद्धा वाचा : फक्त 50 रुपयांत घरबसल्या बनवा डुप्लिकेट पॅन कार्ड, पाहा सोपा मार्ग 
oppo reno 8 pro

OPPO Reno 8 सिरीजच्या अपेक्षित किमती

Oppo Reno 8 च्या विविध मॉडेल्सची भारतात अपेक्षित किंमत किती आहे?

– 8GB/128GB मॉडेलसाठी 29,990 रुपये 

– 8GB/256GB प्रकारासाठी 31,990 रुपये

– 12GB/256GB मॉडेलसाठी 33,990 रुपये 

दुसरीकडे, Oppo Reno 8 Pro ची किंमत 42,900 ते 46,000 रुपये असेल, असे सांगितले जात आहे. Reno बर्‍याच मॉडेल्सप्रमाणे, Flipkart आणि ऑफलाइन स्टोअर्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे.  कंपनी बँक ऑफरद्वारे 3,000 रुपयांची त्वरित सूट देणार आहे, अशी देखील माहिती मिळाली आहे.

oppo reno 8 pro

Oppo Reno 8 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Oppo Reno 8 फोन 120Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंच लांबीच्या AMOLED डिस्प्लेसह येईल. इतर प्रमुख फीचर्समध्ये MediaTek Dimensity 1300 SoC, 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर, 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आणि 80W सुपर फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग देणारी 4,500mAh बॅटरी यांचा समावेश आहे.

Oppo Reno 8 Pro ची संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

दुसरीकडे, Reno 8 Pro मॉडेल 6.62-इंच फुल-HD+ AMOLED E4 डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon 7 Gen 1 SoC सह येऊ शकतो. इतर प्रमुख फीचर्समध्ये 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज, 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी  सेन्सर आणि 80W सुपर फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500mAh बॅटरी यांचा समावेश असू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo