प्रतीक्षा संपली ! OPPO Reno 8 5G ची विक्री आजपासून सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

प्रतीक्षा संपली ! OPPO Reno 8 5G ची विक्री आजपासून सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
HIGHLIGHTS

OPPO Reno 8 5G स्मार्टफोनची पहिली विक्री आज

OPPO Reno 8 5G दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर विक्रीसाठी जाईल

OPPO Reno 8 5G मध्ये 80W SuperVOOC चार्जिंग उपलब्ध

Oppo Reno 8 आज पहिल्यांदाच देशात विकला जाणार आहे. हा डिवाइसने गेल्या आठवड्यात Oppo Reno 8 Pro सह भारतीय बाजारपेठेत पदार्पण केले होते. नवीनतम रेनो सिरीज डिव्हाइस MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आणि 4500mAh बॅटरीद्वारे समर्थित आहे. Oppo Reno 8 च्या इतर हायलाइट्समध्ये 6.4-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले, 50MP प्रायमरी कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 80W SuperVOOC चार्जिंग यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा :  SBI ग्राहकांना विसावा ! तुम्हाला आता बँकेत जाण्याची गरज नाही, WhatsApp च्या माध्यमातून होणार 'ही' कामे

OPPO RENO 8 ची किंमत आणि उपलब्धता 

Oppo Reno 8 ची विक्री दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि ओप्पो स्टोअर्सवर केली जाईल. HDFC, SBI, ICICI, आणि Kotak Bank कार्ड वापरून डिव्हाइस खरेदी करण्यावर तुम्हाला 10% झटपट सूट मिळू शकते. Oppo Reno 8 8GB + 128GB व्हेरिएंट 29,999 रुपयांना खरेदी करता येईल.

OPPO RENO 8

OPPO RENO 8

 Reno 8 स्मार्टफोन हा Reno 8 Pro पेक्षा फारसा वेगळा नाही. सर्वप्रथम, यात प्लॅस्टिक बिल्ड आहे, तर प्रो मॉडेलला ग्लास बॅक मिळतो. याशिवाय, यात तुम्हाला 90Hz रिफ्रेश रेटसह फुल-HD रिझोल्यूशन (2,400×1,080 पिक्सेल) सह 6.4-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये तुम्हाला MediaTek 1300 प्रोसेसर दिला जात आहे.

फोनच्या ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपमध्ये समान सेन्सर आहेत. यमध्ये, 2-मेगापिक्सेल GC02M1 मॅक्रो सेन्सर मिळतो. तुम्हाला फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट सेंसरसुद्धा मिळत आहे. यात 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4,500mAh बॅटरी देखील मिळेल.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo