12GB रॅम असलेल्या Oppo Reno 7 Pro स्मार्टफोनवर 20,000 रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर

12GB रॅम असलेल्या Oppo Reno 7 Pro स्मार्टफोनवर 20,000 रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर
HIGHLIGHTS

Oppo Reno 7 Pro स्मार्टफोनवर प्रचंड सवलत उपलब्ध

Croma च्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये सवलत मिळेल

सर्व मॉडेलसह फोनची किमंत 27,499 रुपयांपर्यंत कमी होणार

Oppo च्या प्रिमियम रेनो सिरीजमधील उपकरणे पावरफुल फीचर्स आणि उत्कृष्ट कॅमेरा परफॉर्मन्ससह येतात. जर तुम्हाला प्रीमियम डिव्हाइस खरेदी करायचे असेल आणि तुमचे बजेट 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला Oppo Reno 7 Pro खरेदी करण्याची संधी आहे. या डिवाइसचा 12GB रॅम वेरिएंट फक्त 27,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही सेलची प्रतीक्षा करावी लागणार नाही.

हे सुद्धा वाचा : Vivo T1 5G चा नवा व्हेरिएंट भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Croma स्टोअरमध्ये ग्राहकांना कमी किमतीत 5G डिव्हाइस खरेदी करण्याची संधी मिळत आहे. Oppo Reno 7 Pro 5G ची सूचीबद्ध किंमत 47,999 रुपये आहे. परंतु ते गेल्या वर्षी 39,999 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आले होते. या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेन्सरभोवती एक खास 'ऑर्बिट ब्रेथिंग लाइट' आहे, ज्यामुळे हा फोन इतरांपेक्षा हटके बनतो आणि नोटिफिकेशन्स आल्यावर यूजर्सना लाइटद्वारे माहिती मिळते.

ऑफर्स :

Oppo Reno 7 Pro च्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची सध्या Croma ऑनलाइन स्टोअरवर किंमत 30,999 रुपये आहे. याशिवाय, हे उपकरण कार्टमध्ये ऍड केल्यावर 1,500 रुपयांची सूट आहे. तसेच HDFC बँक कार्ड वापरून पेमेंटवर 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट आहे. या सर्व ऑफर्स एकत्र करून, या प्रो मॉडेलची किंमत 27,499 रुपयांपर्यंत कमी होणार आहे.

Oppo Reno 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. फोन MediaTek Dimensity 1200-Max चिपसेटसह 12GB RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेज सह आहे. या फोनमध्ये 65W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh बॅटरी आहे.

Oppo Reno 7 Pro च्या मागील पॅनलवर 50MP Sony IMX766 प्राइमरी सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा लेन्स देण्यात आला आहे. फोनमध्ये कलर टेम्परेचर सेन्सरही देण्यात आला आहे. तसेच, यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP Sony IMX709 फ्रंट कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo