Oppo च्या सर्व 5G उपकरणांमध्ये चालेल Airtel 5G Plus, दोन्ही कंपन्यांनी केली भागीदारी

Oppo च्या सर्व 5G उपकरणांमध्ये चालेल Airtel 5G Plus, दोन्ही कंपन्यांनी केली भागीदारी
HIGHLIGHTS

Airtel ने 5G सेवा Airtel 5G Plus नावाने सुरु केली.

Oppo च्या सर्व 5G उपकरणांमध्ये Airtel 5G Plus चालेल.

यासाठी दोन्ही कंपन्यांनी भागीदारी केलेली आहे.

देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी Airtelने 1 ऑक्टोबर रोजी आपली 5G सेवा सुरू केली होती. आता कंपनीने आपली 5G सेवा Airtel 5G Plus या नवीन नावाने सुरू केली आहे. Airtel 5G Plus 6 ऑक्टोबरपासून मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसीसह देशातील आठ शहरांमध्ये लाइव्ह करण्यात आले आहे.

त्यानंतर, आता Oppo India ने देखील Airtel 5G Plus संदर्भात मोठी घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की, Oppo चे सर्व 5G उपकरण एअरटेलच्या 5G सेवेला सपोर्ट करतील. म्हणजेच, जर तुमच्याकडे Oppo चे 5G डिव्हाइस असेल, तर तुम्ही Airtel 5G Plus वापरू शकता. खरं तर, वापरकर्त्यांना चांगला 5G अनुभव देण्यासाठी Airtel आणि Oppo यांच्यात भागीदारी झाली आहे.

हे सुद्धा वाचा : Aryan Khan वेब सीरिजद्वारे इंडस्ट्रीत करणार पदार्पण, प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याकडून घेतोय ट्रेनिंग

 "ग्राहकांना सिमलेस व्हिडिओ कॉलिंग, क्लाउडवर लॅग-फ्री गेमिंग आणि सर्व कॅटगरीमध्ये सर्व 5G मॉडेलमध्ये हाय-स्पीड डेटासह अपलोड आणि डाउनलोड करता येईल. अल्ट्राफास्ट एअरटेल 5G कनेक्टिव्हिटीचा आनंद घेण्यासाठी, ग्राहकांना त्यांच्या डिव्हाइसच्या नेटवर्क सेटिंग्जमध्ये जाऊन त्यांचे पसंतीचे नेटवर्क Airtel 5G मध्ये बदलणे आवश्यक आहे.", असे ओप्पो इंडियाने एअरटेलसोबतच्या भागीदारीत म्हटले आहे. 

Oppo इंडियाचे आर अँड डी प्रमुख तस्लीम आरिफ म्हणाले, ''ओप्पो विकसित तंत्रज्ञानाद्वारे समर्थित आहे, जे वापरकर्त्यांची लाईफस्टाईल कॉलिटी वाढवेल, जसा आमच्या ब्रँडचा प्रस्ताव आहे – इन्स्पिरेशन अहेड. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 5G. भारतात याला पुढे नेण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाच्या इको-सिस्टमच्या नाविन्यपूर्णतेमध्ये आणि सहकार्यामध्ये सहभागी झालो आहोत. आमची टीम सर्वांना 5G प्रदान करण्यासाठी सतत काम करत आहे."

तर  पुढे म्हणाले की, "या प्रवासाचा एक भाग असल्याबद्दल आणि Oppo वापरकर्त्यांना 5G अनुभव प्रदान करण्यात आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही एअरटेलचे आभार मानतो. भविष्यात 5G विकसित होत असतानाही, 5G मध्ये आघाडीवर राहण्यासाठी आम्ही आमची उर्जा नवनिर्मितीवर केंद्रित करत राहू."

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo