ओप्पो A30 स्मार्टफोन: 2.3Ghz क्वालकॉमने सुसज्ज असलेला ओप्पो A30 लाँच

ओप्पो A30 स्मार्टफोन: 2.3Ghz क्वालकॉमने सुसज्ज असलेला ओप्पो A30 लाँच
HIGHLIGHTS

मागील काही दिवसांपासून चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी आपल्या कॅमेरा स्मार्टफोनला घेऊन चर्चेत होती आणि आता ही कंपनी आपला नवीन स्मार्टफोन घेऊन बाजारात आली आहे, ह्या स्मार्टफोनचे नाव आहे, ओप्पो A30.

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो आपल्या आणखी एका नवीन स्मार्टफोन ओप्पो A30 सह बाजारात आली आहे. ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाँच केले गेले आहे. मात्र ह्या स्मार्टफोनविषयी कोणतेही प्रेस रिलीज आलेले नाही किंवा कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र ओप्पोच्या चीनच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे.

 

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची वाइड स्मार्टफोन FHD डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 2.3GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन क्वाड-कोर प्रोसेसरसह एड्रेनो 330 GPU दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात 3GB ची रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपसह ओप्पोच्या स्वत:च्या कलर ओएस 2.1 UI वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये त्याशिवाय १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.2 अॅपर्चरसह आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.

फोनच्या कनेक्टिव्हिटीविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4G LTE मिळत आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये आपल्याला 2525mAh ची बॅटरी मिळत आहे.

ह्याआधी कंपनीने आपला ओप्पो F1 सेल्फी स्मार्टफोन लाँच केला होता. ओप्पो F1, हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित कलरओएस 2.1 वर काम करेल. आणि ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD 720×1280 पिक्सेल रिझोल्युशनची IPS डिस्प्ले दिली आहे. स्मार्टफोन अॅल्युमिनियम बॉडीने बनलेला आहे. स्मार्टफोनची डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 ने प्रोटेक्टेड आहे. स्मार्टफोनमध्ये 1.7Ghz चे ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर आणि एड्रेनो 405 GPU दिले गेले आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये 3GB ची रॅम दिली गेली आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.2 अॅपर्चरसह दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात LED फ्लॅशसुद्धा दिली आहे. स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.

हेदेखील वाचा- LeEco Le 1S:२५ फेब्रुवारीपासून मिळणार रजिस्ट्रेशनशिवाय

हेदेखील वाचा – LG G5 आणि त्याच्या एक्सेसरिज विषयी जाणून घ्या सविस्तर

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo