Oppo चा 50MP कॅमेरा असलेला उत्तम परवडणारा फोन, कमी किमतीत मिळतील मजबूत फीचर्स

Oppo चा 50MP कॅमेरा असलेला उत्तम परवडणारा फोन, कमी किमतीत मिळतील मजबूत फीचर्स
HIGHLIGHTS

Oppo A17 नवा स्मार्टफोन भारतात लाँच

नव्या स्मार्टफोनची एकूण किंमत 12,499 रुपये

साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

Oppo A सीरीजचा नवीन स्मार्टफोन Oppo A17 लाँच झाला आहे. फोन 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. त्याची किंमत 12,499 रुपये आहे. हा Oppo स्मार्टफोन तुम्ही कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर तसेच रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता. लाँच ऑफर अंतर्गत, तुम्हाला फोनवर 10% ची त्वरित सूट देखील मिळेल. या सवलतीसाठी, तुम्हाला एक्सिस, HDFC, ICICI, कोटक किंवा येस बँक कार्डने पैसे द्यावे लागतील. Oppo च्या या फोनमध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा व्यतिरिक्त इतर अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : Amazon GIF Sale: 'दसरा डिलाईल'मध्ये स्वस्तात मिळतायेत स्मार्टफोन्स, सर्वोत्तम डील्स पहा

Oppo A17 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये कंपनी HD+ रिझोल्यूशनसह 6.56-इंच लांबीचा डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाइनचा आहे आणि त्याची पीक ब्राइटनेस लेव्हल 600 निट्स आहे. Oppo A17 स्मार्टफोन 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB eMMC5.1 स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून यात ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ G35 चिपसेट आहे. 

साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये बॅटरी चार्ज करण्यासाठी मायक्रो USB पोर्ट आहे. मिडनाईट ब्लॅक आणि सनलाईट ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या फोनमध्ये ड्युअल सिम, 4G, Wi-Fi, ब्लूटूथ 5.3 आणि GPS सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय देण्यात आले आहेत.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी फोनमध्ये तुम्हाला 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. Oppo चा हा फोन Android 12 वर आधारित ColorOS 12.1.1 वर काम करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo