भारतात उद्या लाँच होणार वनप्लस X स्मार्टफोन

भारतात उद्या लाँच होणार वनप्लस X स्मार्टफोन
HIGHLIGHTS

अलीकडेच वनप्लस X ला टीनावर लिस्ट केले गेले होते. काही लीक्सनुसार, वनप्लसX ची किंमत २५० डॉलर(जवळपास १६,५०० रुपये) असेल आणि हा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये उपलब्ध होईल.

मोबाईल निर्माता कंपनी वनप्लस उद्या म्हणजेच २९ ऑक्टोबरला आपला एक मिडिया इव्हेंट आयोजित करत आहे. त्यासाठी कंपनीने मीडियाला निमंत्रण पाठवले आहे. असे सांगितले जातय की, ह्या कार्यक्रमात कंपनी आपला नवीन स्मार्टफोन X सादर करेल.

 

ह्या सर्व कार्यक्रमाची माहिती कंपनीच्या स्थानीय ट्विटर हँडलद्वारा दिली गेली होती.त्यामुळे उद्या हा नवीन स्मार्टफोन वनप्लस X लाँच केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. कंपनीने ह्याची अधिकृत टिजर इमेज शेअर केली आहे, त्यात लेटर’X’ गडद बॅकग्राउंडमध्ये चमकताना दिसत आहे. अशातच वनप्लसX लाँच करण्याची शक्यता वाढतच जात आहे. ह्याला कंपनीच्या नवीन बजेटच्या फोनमध्ये जोडले गेले आहे.

 

अलीकडेच वनप्लस X ला टीनावर लिस्ट केले गेले होते. काही लीक्सनुसार, वनप्लसX ची किंमत २५० डॉलर(जवळपास १६,५०० रुपये) असेल आणि हा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये उपलब्ध होईल.

ह्याच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात तीन कपॅसेटिव बटण डिस्प्लेच्या खाली दिसतायत. वनप्लसX स्मार्टफोन मेटल फ्रेम फिनिशसह येईल आणि त्यात असेल ‘साइडटच’ वैशिष्ट्य. ह्याचा वापर करुन यूजर स्क्रीनच्या उजव्या बाजूला स्पर्श करुन अॅप्स किंवा कॅमेरा सेटअप लाँच करु शकता. त्याचबरोबर हा सिनेप्टिक्सच्या क्लियरफोर्स टेक्नॉलॉजीने सुसज्ज असेल, जो आयफोन 6S च्या फोर्स टच डिस्प्ले सारखा काम करतो. त्याचबरोबर ह्यात ५ इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे., ज्याचे रिझोल्युशन १०८०x१९२० पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 401ppi आहे. डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चे संरक्षित केली आहे.

हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक MT6795 चिपसेट आणि 2GB रॅमने सुसज्ज असेल. ह्यात ३२जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा असेल. ह्यात सोनी IMX258 सेंसरने सुसज्ज १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये २४५०mAh ची बॅटरीसुद्धा दिली गेली आहे. वनप्लसX किंवा वनप्लस मिनी ऑक्सिजन ओएस ३.० वर चालतो, जो अॅनड्रॉईड ६.० मार्शमॅलोवर आधारित आहे. ह्याच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, वनप्लसX FM रेडियो, NFC आणि IR ब्लास्टरसोबत येईल.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo