आता कोणत्याही निमंत्रणाशिवाय उपलब्ध होणार वनप्लस X स्मार्टफोन

आता कोणत्याही निमंत्रणाशिवाय उपलब्ध होणार वनप्लस X स्मार्टफोन
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन 2.3GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 चिपसेटने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.

मोबाईल निर्माता कंपनी वनप्लसने अशी माहिती दिली आहे की, आता वनप्लस X खरेदी करण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही. आता ह्या स्मार्टफोनला कोणत्याही निमंत्रणाशिवाय खरेदी करु शकता. ही ऑफर सध्यातरी भारतात लागू झाली नाही. मात्र लवकरच भारतात कोणत्याही निमंत्रणाशिवाय ह्या हँडसेटची विक्री भारतात सुरु होईल.

 

वनप्लसचे सहसंस्थापर कार्ल पे नीं कंपनीच्या फोरमवर लिहिले आहे की, “आम्ही वनप्लस X ला कोणत्याही निमंत्रणाशिवाय उपलब्ध करण्यासाठी आम्ही खूपच उत्साहित आहोत.”

त्याचबरोबर त्यांनी अशीही माहिती दिली की, कंपनी प्रत्येक लाँच सह ग्राहकांची मागणी आणि अपेक्षा ह्याविषयी बरेच काही शिकत आहे. तथापि, त्यांनी थोडा जोर देऊन असे सांगितले आहे की, निमंत्रण पद्धत ही कंपनीच्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी सांगितले की, वनप्लस 2 ला लाँचच्या ४ महिन्यानंतर कोणत्याही निमंत्रणाशिवाय हा उपलब्ध केला होता. ह्यावेळी वनप्लस X ला तर ह्यापेक्षाही कमी वेेळेत उपलब्ध केले गेले आहे.

वनप्लसने भारतात स्मार्टफोन X चे दोन व्हर्जन सादर केले होते. जर वनप्लस X च्या दोन्ही वेगवेगळ्या प्रकाराविषयी बोलायचे झाले तर, ग्लास व्हर्जन वनप्लस X ओनिक्स ब्लॅकग्लास सह लाँच केला होता. ह्याची किंमत १६,९९९ रुपये आहे आणि ह्याचे वजन १३८ ग्रॅम आहे. तर दुसरा व्हर्जन वनप्लस X सेरामिकविषयी बोलायचे झाले तर, ह्यात जिर्कोनियाचा वापर केला गेला आहे आणि ह्याची किंमत २२,९९९ रुपये आहे आणि ह्याचे वजन केवळ १६० ग्रॅम आहे.

ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. ही डिस्प्ले AMOLED आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एक हायब्रिड ड्यूल सिम दिले आहे. वनप्लस एक्स स्मार्टफोन ऑक्सिजनओएस 2.1 वर चालेला जो अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. हा स्मार्टफोन 2.3GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 चिपसेटने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील वाचा- हुआवे ऑनर 5X आणि होली 2 प्लस स्मार्टफोन लाँच

हेदेखील वाचा- जिओनी E-लाइफ S8 स्मार्टफोन होणार २२ फेब्रुवारीला लाँच

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo