OnePlus Summer Sale : सर्व प्रोडक्ट्सवर मिळणार भारी सूट, 60 हजारपर्यंत सवलत

HIGHLIGHTS

OnePlus Summer Sale 10 मे 2023 पर्यंत

स्मार्टफोनवर 12 हजार रुपयांपर्यंत बचत करता येईल.

तर, स्मार्ट TVवर 60 हजार रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट

OnePlus Summer Sale : सर्व प्रोडक्ट्सवर मिळणार भारी सूट, 60 हजारपर्यंत सवलत

भारतीय ग्राहकांमध्ये OnePlus ब्रँडचे प्रोडक्ट्स लोकप्रिय आहेत. सध्या कंपनीच्या अधिकृत साइटवर OnePlus समर सेल 2023 सुरू आहे. हा सेल 10 मे 2023 पर्यंत म्हणजेच उद्या पर्यंत लाइव्ह असेल, त्यामुळे तुम्हाला जरा घाई करावी लागणार आहे. सेल दरम्यान तुम्हाला स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि वेअरेबलवर 12,000 रुपयांपर्यंतच्या बंपर डिस्काउंट मिळेल.  

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

स्मार्टफोन्सवरील डिस्काउंट 

OnePlus 10T स्मार्टफोनचा 8GB वेरिएंट 5,000 रुपयांनी कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. सेल दरम्यान हा हँडसेट 44,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याबरोबरच, OnePlus 10 Pro मोबाईल फोनचा 8 GB रॅम 66,999 रुपयांमध्ये विकला जातो. पण OnePlus सेल मध्ये हा डिवाइस 55,999 रुपयामध्ये मिळतोय.  

OnePlus 9 5G स्मार्टफोनचा 8 GB रॅम व्हेरिएंटवर 12 हजार रुपयांपर्यंत बचत करता येईल. फोन सेल दरम्यान 37 हजार 999 रुपयांना विकला जात आहे. या फोनची मूळ किंमत 49,999 रुपये आहे. 

TV वरील डिस्कॉउंट 

 65 इंच OnePlus Q2 Pro टीव्हीवर 60 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर हा टीव्ही 1 लाख 59 हजार 999 रुपयांऐवजी 99 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. OnePlus Y1S Pro च्या 43 इंच मॉडेलची किंमत 39,999 रुपये आहे, सेलमध्ये हा स्मार्ट टीव्ही मॉडेल 26 हजार 999 रुपयांना मिळतोय.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo