भारीच की! OnePlus Open मध्ये देखील काम करेल eSIM, आता नवीन सॉफ्टवेअर अपडेटसह कॅमेरा देखील उत्कृष्ट। Tech News 

भारीच की! OnePlus Open मध्ये देखील काम करेल eSIM, आता नवीन सॉफ्टवेअर अपडेटसह कॅमेरा देखील उत्कृष्ट। Tech News 
HIGHLIGHTS
  • OnePlus Open हा बुक-स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन Hasselblad-ब्रँडेड ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो.

  • या फोनला नवीन सॉफ्टवेअर अपडेट मिळाले आहे, ज्यामध्ये eSIM सपोर्ट आणला गेला आहे.

  • या फोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 2 SoC सह सुसज्ज आहे.

OnePlus Open या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात आणि जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता. हा बुक-स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन Hasselblad-ब्रँडेड ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. आता या फोनला नवीन सॉफ्टवेअर अपडेट मिळाले आहे, ज्यामध्ये eSIM सपोर्ट आणला गेला आहे. eSIM हे इंडस्ट्री स्टँडर्ड डिजिटल सिम आहे, जे प्रत्यक्ष सिम कार्डला पर्याय म्हणून बाजारात आले आहे. अलीकडे लाँच केलेले फ्लॅगशिप स्मार्टफोन eSIM कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतात.

OnePlus Open अपडेट

आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने फर्मवेअर आवृत्ती 13.2.0.116 सह भारतात OnePlus Open साठी नवीन अपडेट जारी केले आहे. या अपडेटसह फोल्डेबल्समध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक वर सांगितल्याप्रमाणे eSIM सपोर्ट आहे. त्याबरोबरच, सुधारित सिस्टम कार्यप्रदर्शन आणि दोष निराकरणे व्यतिरिक्त, कॅमेरा देखील या अपडेटमध्ये सुधारला आहे.

oneplus open camera

लक्षात घ्या की, हे अपडेट टेलीफोटो कॅमेऱ्याने कॅप्चर केलेल्या फोटोंची क्लियारीटी सुधारते. याव्यतिरिक्त, फोटो आणि प्रो मोडमध्ये घेतलेल्या फोटोजच्या टोन आणि कलरमधील अचूकता देखील सुधारली आहे, असा दावा वनप्लसने केला आहे.

OnePlus Open

OnePlus Open मध्ये 7.82-इंच लांबीचा 2K Flexi-Fluid LTPO 3.0 AMOLED इनर डिस्प्लेसह येतो. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. त्याबरोबरच, यात 6.31-इंच लांबीचा 2K LTPO 3.0 सुपर फ्लुइड AMOLED आऊटर स्क्रीन देखील आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 2 SoC सह सुसज्ज आहे, 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह जोडलेला आहे. सुरक्षिततेसाठी यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 48MP OIS प्रायमरी सेन्सर, 64MP टेलिफोटो शूटर आणि 48MP अल्ट्रावाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. याशिवाय, इनर डिस्प्लेमध्ये 20MP फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे, तर बाहेरील पॅनेलमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4800mAh बॅटरी आहे, जी 67W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. हा हँडसेट OxygenOS 13.2 सह येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

We will be happy to hear your thoughts

Leave a reply

Digit.in
Logo
Digit.in
Logo
Compare items
  • Water Purifier (0)
  • Vacuum Cleaner (0)
  • Air Purifter (0)
  • Microwave Ovens (0)
  • Chimney (0)
Compare
0