OnePlus च्या नवीन 5G फोनमध्ये स्पेसिफिकेशन्स आले समोर, वाचा डिटेल्स…

HIGHLIGHTS

OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स आले समोर

फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कंपनी यामध्ये 108-मेगापिक्सेल कॅमेरा देणार

फोन 8GB RAM + 128GB इंटर्नल स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB इंटर्नल स्टोरेज या दोन व्हेरिएंटसह येऊ शकतो.

OnePlus च्या नवीन 5G फोनमध्ये स्पेसिफिकेशन्स आले समोर, वाचा डिटेल्स…

OnePlus आपल्या Nord सीरीजचा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनचे नाव OnePlus Nord CE 3 5G आहे. हा फोन लवकरच बाजारात येऊ शकतो. याच्या लॉन्च डेटबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला फोन लाँच होण्याची शक्यता आहे.फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कंपनी यामध्ये 108-मेगापिक्सेल कॅमेरा देईल. लीक झालेल्या रिपोर्टमध्ये आणखी अनेक फीचर्स समोर आले आहेत. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Samsung च्या 5G फोनवर पुन्हा एकदा शानदार डील, तब्बल 9 हजार रुपयांची सूट

OnePlus Nord CE 3 5G चे संभावित फीचर्स 

OnLeaks आणि GadgetGang ने या आगामी स्मार्टफोनची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लीक केली आहेत. लीकनुसार, कंपनी या फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले देणार आहे. फोनची किंमत बजेटमध्ये ठेवण्यासाठी यामध्ये IPS LCD पॅनल दिला जाऊ शकतो. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसर म्हणून यात Nord CE 2 प्रमाणे Snapdragon 695 चिपसेट दिला जाऊ शकतो.

Nord CE3 5G मध्ये, तुम्हाला साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि AI फेस अनलॉकसह 5000mAh बॅटरी पाहायला मिळेल. ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Nord CE 3 8GB RAM + 128GB इंटर्नल स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB इंटर्नल स्टोरेज या दोन व्हेरिएंटसह येऊ शकतो. हा फोन भारतात जवळपास 25 हजार रुपयांच्या किंमतीसह लॉन्च केला जाऊ शकतो.

याव्यतिरिक्त, कंपनी या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देऊ शकते. यात 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा 2-मेगापिक्सेल खोलीसह आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असेल. तसेच, आकर्षक सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo