कंपनीचा आगमी स्मार्टफोन OnePlus Nord 3 लवकरच लाँच होणार आहे. या कंपनीचे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. OnePlus Nord 3 बाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. आता या फोनबाबत आणखी एक अपडेट पुढे आले आहे. आता OnePlus Nord 3 ची किंमत आणि स्टोरेज व्हेरिएंट उघड झाले आहेत.
Survey
✅ Thank you for completing the survey!
OnePlus Nord 3 ची संभावित किंमत
हा स्मार्टफोन इतर देशांमध्ये दोन व्हेरिएंटसह सादर केला जाऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे. बेस मॉडेल 8GB RAM, 128GB स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे. हा व्हेरिएंट 449 युरो म्हणजेच सुमारे 40,000 हजार रुपये असू शकते. तर 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 549 युरो म्हणजेच सुमारे 48,500 रुपये असण्याची शक्यता आहे. खरं तर, इतर बाजारपेठांपेक्षा OnePlus Nord 3 भारतीय बाजारपेठेत कमी किमतीत लाँच होण्याची शक्यता आहे.
OnePlus Nord 3 मध्ये 6.74-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz असू शकतो. हा फोन डायमेंसिटी 9000 चिपसेट सह येईल, असे सांगण्यात आले आहे. डिस्प्लेमध्येच फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येईल. समोर 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
त्याबरोबरच, OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आकर्षक फोटोग्राफीसाठी दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. फोन 5,000mAh बॅटरीसह सुसज्ज असेल, जी 18W चार्जिंग समर्थनासह येईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile