OnePlus ने आपला Nord-सिरीजचा स्मार्टफोन OnePlus Nord 2T मे मध्ये यूके आणि युरोपियन बाजारात लाँच केला. OnePlus Nord 2T हा एक उच्च मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन आहे. टिपस्टर अभिषेक यादवने अलीकडेच खुलासा केला की, नॉर्ड 2T भारतात 1 जुलै रोजी लाँच होईल. आता टिपस्टरने एक मार्केटिंग पोस्टर देखील जारी केले आहे, ज्यामध्ये 1 जुलै रोजी Nord 2T लाँच होणार असल्याचे दिसून येते.
हे सुद्धा वाचा : Netflix लवकरच सादर करणार सर्वात स्वस्त प्लॅन, कंपनीने शोधला सबस्क्रिप्शन्स वाढवण्याचा नवा मार्ग
OnePlus Nord 2T launching on 1 July, 2022 in India at 7 PM.#OnePlus #OnePlusNord2T pic.twitter.com/72Ua8fBmvX
— Abhishek Yadav (@yabhishekhd) June 27, 2022
OnePlus Nord 2T 5G मध्ये Android 12 आधारित OxygenOS 12.1 आहे. याशिवाय, 6.43 इंच लांबीचा फुल HD प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि त्यासोबत HDR10+ साठी सपोर्ट आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे.
फोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह 12 GB पर्यंत RAM आणि 256 GB स्टोरेज आहे. OnePlus Nord 2T 5G मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 50-मेगापिक्सेलचा Sony IMX766 सेन्सर असून ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आहे.
दुसरी लेन्स 8-मेगापिक्सेल सोनी IMX355 अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. तिसरी लेन्स 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम लेन्स आहे. सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा Sony IMX615 सेन्सर आहे. फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आहे, जी जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, यामध्ये Wi-Fi 6, ब्लूटूथ v5.2 आणि NFC सह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus Nord 2T 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्यतिरिक्त 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटसह ऑफर केला जाऊ शकतो. पहिल्या वेरिएंटची किंमत 28,999 रुपये आणि दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये असेल.
Price: |
![]() |
Release Date: | 26 Mar 2022 |
Variant: | 128 GB/8 GB RAM , 256 GB/12 GB RAM |
Market Status: | Launched |