लाँच आधीच करु शकता वनप्लस 3 स्मार्टफोनचा रिव्ह्यू

HIGHLIGHTS

केवळ ३० लोकच वनप्लस 3 स्मार्टफोनचा लाँच आधी रिव्ह्यू करु शकतात.

लाँच आधीच करु शकता वनप्लस 3 स्मार्टफोनचा रिव्ह्यू

मोबाईल निर्माता कंपनी वनप्लस लवकरच बाजारात आपला नवीन फोन वनप्लस 3 लाँच करणार आहे. मागील काही दिवसांपासून ह्या फोनविषयी बरीच माहिती समोर येत आहे. जसजशी वनप्लस 3 स्मार्टफोनची लाँच डेट जवळ येत आहे, तसतशी त्याची उत्सुकताही शिगेला पोहोचतो. लोकांची ही अशी प्रतिक्रिया पाहून कंपनीसुद्धा ह्या फोनविषयी नवनवीन गोष्टींचा खुलासा करत आहे. आता कंपनी वनप्लस 3 स्मार्टफोनला लाँच करण्याआधी पहिल्या 30 लोकांना ह्या फोनचा रिव्ह्यू करण्याची संधी देत आहे. ह्याचा रिव्ह्यू करण्यासाठी पहिल्या ३० लोकांना ह्या फोनला रिव्ह्यू करण्याची संधी देत आहे. रिव्ह्यू करण्यासाठी यूजर्स कंपनीद्वारा दिल्या गेलेल्या पेजवर जाऊन रजिस्टर करु शकतात. कंपनीला वनप्लस 3 स्मार्टफोनसाठी योग्य फिडबॅक मिळावा ह्यासाठी असं करत आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

ह्या फोनचा रिव्ह्यू करण्यासाठी लोक जगातील कोणत्याही देशात अप्लाय करु शकता. तथापि, हे रजिस्ट्रेशन सोपे नाही. रिव्ह्यू करण्यासाठी इच्छुक यूजर्सला केवळ ५०० शब्दांत ह्या स्मार्टफोनचा रिव्ह्यू करण्यासाठी का निवडले जावे, ह्याबाबत लिहायचे आहे. जर तुम्ही ह्या फोनचा रिव्ह्यू करण्यासाठी निवडले जाता, तर फोन रिव्ह्यू केल्यानंतर आपल्याला हा फोन कंपनीला परत करावा लागेल.

हेदेखील वाचा – हे आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचेस

 

जे लोक ह्यासाठी निवडले जातील, त्यांना हा फोन १३ ते २० जूनदरम्यान उपलब्ध केला जाईल. ह्याच्याच अर्थ असा की, ह्या तारखेनंतर कंपनी आपल्या वनप्लस 3 स्मार्टफोन लाँच करेल. कंपनी वनप्लस 3 स्मार्टफोनसह एक VR सेटसुद्धा लाँच करेल.

हेदेखील वाचा – १ जूनपासून ओपन सेलमध्ये मिळणार शाओमी रेडमी नोट 3
हेदेखील वाचा – भारतात १ जूनपासून लागू होणार गुगल टॅक्स…!!

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo