OnePlus दिवाळी सेल : 11 हजार रुपयांत स्वस्तात 5G फोन खरेदी, 30 सप्टेंबरपर्यंत ऑफर

OnePlus दिवाळी सेल : 11 हजार रुपयांत स्वस्तात 5G फोन खरेदी, 30 सप्टेंबरपर्यंत ऑफर
HIGHLIGHTS

OnePlus दिवाळी सेल ऑफर सुरु

ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत सुरु असेल

OnePlus 10 Pro स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध

OnePlus च्या दिवाळी सेलमध्ये बंपर डिस्काउंटसह प्रीमियम स्मार्टफोन OnePlus 10 Pro 5G खरेदी करता येणार आहे. फोनच्या 8 GB रॅम + 128 GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची MRP 66,999 रुपये आहे. डिस्काउंटनंतर कंपनीच्या वेबसाइटवर फोनची किंमत 61,999 रुपये झाली आहे. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही Axis बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड व्यवहार केल्यास तुम्हाला 6,000 रुपयांची झटपट सूट देखील मिळेल. या ऑफरसह, फोनवर एकूण सूट 11,000 रुपये होईल आणि ती 66,999 रुपयांऐवजी 55,999 रुपयांची असेल. ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत सुरु आहे. 

हे सुद्धा वाचा : तुम्ही लॅपटॉप वापरता का ? 'हे' शॉर्टकट तुमचे काम करतील अधिक सोपे, जाणून घ्या कसे…

OnePlus 10 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

OnePlus 10 Pro मध्ये, कंपनी 3216×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच लांबीचा QHD + AMOLED डिस्प्ले देत आहे. फोनमधील हा डिस्प्ले 120Hz चा रीफ्रेश रेट आणि 1300 nits चा पीक ब्राइटनेस लेव्हल ऑफर करतो. फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 512 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट मिळेणार आहे.

OnePlus च्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन 80W फास्ट आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेला हा फोन Android 12 वर आधारित ColorOS 12.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये NFC सपोर्ट आणि ब्लूटूथ 5.2 व्यतिरिक्त सर्व स्टॅंडर्ड ऑप्शन्स देण्यात आले आहेत.

फोटोग्राफीसाठी फोनचा मागील बाजूस LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 8-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्ससह 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. कंपनी आकर्षक सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo