वनप्लस 3 स्मार्टफोन: एक्सक्लुसिव्हली अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध

वनप्लस 3 स्मार्टफोन: एक्सक्लुसिव्हली अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर आजपासून उपलब्ध झाला आहे. ह्याच्या 6GB व्हर्जनची किंमत २७,९९९ रुपये आहे.

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी वनप्लस ने बाजारात आपला नवीन फोन वनप्लस 3 लाँच केला आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे आणि हा कोणत्याही निमंत्रणाशिवाय खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर आजपासून उपलब्ध झाला आहे. ह्याच्या 6GB व्हर्जनची किंमत २७,९९९ रुपये आहे.

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ऑक्सिजन OS वर चालतो. ह्यात 5.5 इंचाची ऑप्टिक AMOLED पुर्ण HD डिस्प्ले देण्यात आली आहे. ही डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 4 ने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 6GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एड्रेनो 530 GPU दिला गेला आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. ह्या स्टोरेजला आपण वाढवूही शकतो.

हेदेखील पाहा – मोटो G4 प्लस रिव्ह्यू

ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्या रियर कॅमे-यासह LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा देण्यात आले आहे. कनेक्टिव्हीटीसाठी ह्यात NFC सपोर्ट, USB टाइप-C, वायफाय, ब्लूटुथ आणि GPS सारखे फीचर्स देण्यात आले आहे. हा फोन 3000mAh  बॅटरीने सुसज्ज आहे.

हेदेखील वाचा – जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रीडम 251’ २८ जूनपासून मिळणार
हेदेखील वाचा – मिजू M3S स्मार्टफोन लाँच. फिंगरप्रिंट स्कॅनरने सुसज्ज

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo