वनप्लस 2 ची किंमत झाली कमी, २००० रुपयांची झाली घट

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 16 Mar 2016
HIGHLIGHTS

वनप्लसने आपल्या वनप्लस 2 64GB ची किंमतीत २ हजार रुपयांची घट केली आहे. आता वनप्लस चा वनप्लस 2 16GB मॉडलसुद्धा उपलब्ध झाला आहे. ह्याची किंमतसुद्धा कमी झाली आहे.

वनप्लस 2 ची किंमत झाली कमी, २००० रुपयांची झाली घट

OnePlus TV 32Y1 - Smarter TV

Android TV with superior craftsmanship and elegant design - Buy Now

Click here to know more

Advertisements

वनप्लसने आपला आकर्षक फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 2 च्या किंमतीत २ हजार रुपयांपर्यंतची घट केली आहे. ही घट ह्या स्मार्टफोनच्या 64B मॉडलवर केली आहे. आता आपल्याला हा स्मार्टफोन केवळ २२,९९९ रुपयात मिळेल. लॉँचवेळी ह्या स्मार्टफोनची किंमत २४,९९९ रुपये होती. कंपनीचा वनप्लस 2 16GB व्हर्जनसुद्धा उपलब्ध झाला आहे. आणि ह्या स्मार्टफोनच्या किंमतीतही २००० हजार रुपयांची घट केली आहे. आता हा स्मार्टफोन आपल्याला २०,९९९ रुपयात मिळेल. हा स्मार्टफोन २२,९९९ रुपयात लाँच झाला होता.

 

ही माहिती कंपनीने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे. जर आपण वनप्लसच्या ब्लॉगवर जाऊन पाहिलात, तर आपल्याला दोन्ही स्मार्टफोन्सवर २ हजार रुपयांच्या सूटविषयी माहिती मिळेल. ह्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच कंपनीने असेही सांगितले आहे की, हे काही एप्रिल फुल नाही, तर खरी माहिती आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले (1920x1080p) रिझोल्युशनसह दिली गेली आहे. ह्यात क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसरसह 4GB चे रॅम दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा ड्यूल-फ्लॅशसह दिला गेला आहे. ह्या कॅमे-यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन आणि ऑटो फोकससुद्धा दिला गेला आहे. त्याचबरोबर ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिगं कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. फोन यूएसबी टाइप C पोर्टसुद्धा दिला गेला आहे. ह्याच्या हार्डवेअरमध्ये काही बदल केले आहेत.

हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे, जो आपल्याला LTE सपोर्टसह मिळतो आहे. स्मार्टफोनमध्ये 3300mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे. हा स्मार्टफोन ऑक्सिजन ओएसवर चालतो. कंपनीचे म्हणणे आहे की, हा प्लेन वॅनिला अॅनड्रॉईड ओएसवर आधारित नाही.

हेदेखील वाचा - कसा बुक कराल शाओमी रेडमी नोट 3 स्मार्टफोन?

हेदेखील वाचा - अॅप ओव्हरव्ह्यू: Leo Privacy (Advertorial)

logo
Digit NewsDesk

The guy who answered the question 'What are you doing?' with 'Nothing'.

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

latest articles

सर्व पहा
Advertisements

Top Products

hot deals amazon

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status