आकर्षक डिस्प्लेसह OnePlus 12R भारतात होणार दाखल, लाँचपूर्वी स्मार्टफोनचे सर्व स्पेक्स लीक। Tech News 

आकर्षक डिस्प्लेसह OnePlus 12R भारतात होणार दाखल, लाँचपूर्वी स्मार्टफोनचे सर्व स्पेक्स लीक। Tech News 
HIGHLIGHTS

OnePlus 12R भारतीय बाजारात लवकरच लाँच होणार आहे.

OnePlus 12R भारतात 23 जानेवारी रोजी लाँच होणार आहे.

OnePlus 12R मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 प्रोसेसर मिळेल.

सध्या OnePlus 12R भारतीय लाँचमुळे चर्चेत आहे. आगामी स्मार्टफोनबद्दल सतत काही ना काही माहिती पुढे येत आहे. दरम्यान, अलीकडेच या उपकरणाचे डिझाइन उघड करण्यात आले आहे. त्याबरोबरच, OnePlus ने या आगामी मोबाईल फोनच्या डिस्प्ले आणि बॅटरीशी संबंधित माहिती शेअर केली आहे. मात्र, आत्तापर्यंत फोनची किंमत किंवा इतर स्पेसिफिकेशन्सबाबत कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाही.

यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 प्रोसेसर आणि 24GB पर्यंत रॅम मिळेल. फोटोग्राफीसाठी, यात 50MP कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. यामध्ये 5400mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.

OnePlus 12R/Ace 3
OnePlus 12R/Ace 3

OnePlus 12R चे भारतीय लाँच

OnePlus 12R भारतात 23 जानेवारी रोजी लाँच होणार आहे. यासोबतच, बहुप्रतीक्षित स्मार्टफोन OnePlus 12 देखील सादर केला जाईल, जो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जागतिक स्तरावर लाँच झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, OnePlus 12R ची किंमत 39,999 ते 42,999 रुपये दरम्यान ठेवली जाऊ शकते. मात्र, फोनची वास्तविक किंमत लाँचनंतरच पुढे येईल. हा फोन अनेक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध करून दिला जाईल.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या फोनची मागील आवृत्ती OnePlus 11R ची किंमत 39,999 रुपयांपासून सुरू होते. फोटोग्राफीसाठी, OnePlus 11R मध्ये 50MP रियर कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी 16MP कॅमेरा उपलब्ध आहे.

OnePlus 12R/Ace 3
OnePlus 12R/Ace 3

OnePlus 12R चे लीक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीच्या मते, OnePlus 12R मध्ये 4th जनरेशन LTPO ProXDR डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. पूर्वीपेक्षा आता फोनचा स्क्रीन रिफ्रेश रेट अधिक वेगाने बदलेल, ज्यामुळे वापरकर्त्यांचा अनुभव सुधारेल. यामुळे बॅटरीचा वापरही कमी होईल. अलीकडील लीक्सनुसार, Qualcomm चा प्रोसेसर OnePlus 12R मध्ये मिळू शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स दिले जातील.

या स्मार्टफोनमध्ये 24GB पर्यंत रॅम मिळेल. तर, कॅमेरा विभागात 50MP कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. आगामी OnePlus 12R मध्ये 5,500mAh बॅटरी असेल, जी SuperVOOC फास्ट चार्जिंग आणि बॅटरी हेल्थ इंजिन तंत्रज्ञानाला सपोर्ट करेल. या टेक्नॉलॉजीमुळे बॅटरी दीर्घकाळ काम करेल, असे म्हटले जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo