OnePlus 10R च्या किमतीत दुसऱ्यांदा कपात, स्वस्तात खरेदी करा जबरदस्त महागडा फोन

HIGHLIGHTS

OnePlus 10R ची किंमत कमी झाली आहे.

OnePlus 10R वर 3000 रुपयांची सूट मिळाली आहे.

OnePlus 10R मध्ये तीन व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

OnePlus 10R च्या किमतीत दुसऱ्यांदा कपात, स्वस्तात खरेदी करा जबरदस्त महागडा फोन

स्मार्टफोन निर्माता OnePlus ने आपल्या OnePlus 10R फोनच्या किंमतीत कपात केली आहे. हा फोन 2022 मध्ये 38,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च झाला होता. आता या फोनच्या किमतीत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. ताज्या किमतीत कपात केल्यानंतर त्याची किंमत 31,999 रुपये झाली आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

OnePlus 10R च्या किमतीत पहिली कपात 

OnePlus 10R च्या किंमतीत ही दुसरी कपात आहे. किंमत घसरल्यानंतर, स्मार्टफोनच्या 8GB+128GB, 80W व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये होती, तर 12GB+256GB 80W व्हेरिएंटची किंमत 38,999 रुपये आणि 12GB+256GB, 150W ची किंमत 39,999 रुपये झाली होती.

नव्या कपातीनंतर किंमत किती ? 

नव्या कपातीनंतर फोनची किंमत परत तीन हजार रुपयांनी कमी झाली आहे. OnePlus 10R (8GB+128GB, 80W): 31,999 रुपये,  OnePlus 10R (12GB+256GB, 80W): 35,999 रुपये आणि OnePlus 10R (12GB+256GB, 150W): 36,999 रुपये. नव्या किमती तुम्हाला Amazon वर बघायला मिळतील. 

OnePlus 10R चे स्पेसिफिकेशन्स 

या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच फुल HD + AMOLED डिस्प्लेसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील उपलब्ध आहे. यासोबतच, तुम्हाला फ्रंटमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा आणि इतर अनेक फीचर्स मिळतील. ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Android 12 आधारित ऑक्सिजन OS 12.1 वर काम करतो. यासोबतच, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8100-Max चा प्रोसेसर इन्स्टॉल करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी तुम्हाला एकदा चार्ज केल्यानंतर बराच वेळ फोन वापरण्याचा अनुभव देईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo