OnePlus चा 40 हजारांचा फोन 10,000 च्या सवलतीसह खरेदी करा, वाचा डिटेल्स

OnePlus चा 40 हजारांचा फोन 10,000 च्या सवलतीसह खरेदी करा, वाचा डिटेल्स
HIGHLIGHTS

OnePlus ने मागील वर्षी भारतात आपला मिड रेंज फोन OnePlus 10R 5G लाँच केला होता.

Amazon यावर 4,000 रुपयांचे कूपन डिस्काउंट देत आहे.

फोनच्या टॉप एन्ड व्हेरिएंटवर देखील ऑफर्स

स्मार्टफोन ब्रँड OnePlus ने मागील वर्षी भारतात आपला मिड रेंज फोन OnePlus 10R 5G लाँच केला. या फोनवर आता मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. फोनमध्ये 120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीच्या फुल HD + AMOLED डिस्प्लेसाठी देखील समर्थन आहे. त्याबरोबरच फोनमध्ये MediaTek Dimensity 8100-Max प्रोसेसर आहे.  40,000 रुपये किंमतीचा हा फोन Amazon वरून केवळ 29,000 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. फोनमध्ये अनेक अप्रतिम फीचर्स देखील आहे. चला सविस्तरपणे जाणून घेऊयात फोनवरील ऑफर्स- 

OnePlus 10R 5G वरील ऑफर्स 

OnePlus 10R चे बेस 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेल सध्या Amazon वर 34,999 रुप्यानं उपलब्ध आहे. ई-कॉमर्स कंपनी फोनवर 4,000 रुपयांचे कूपन डिस्काउंट देत आहे. त्यानंतर फोनची किंमत 30,999 रुपये होईल. याव्यतिरिक्त, HDFC कार्ड आणि EMI व्यवहार वापरणारे ग्राहक 1,500 रुपयांपर्यंत सूट देखील मिळेल.  

सर्व ऑफर्ससह, फोनची किंमत आता 29,499 रुपयांपर्यंत खाली येईल. एवढेच नाही तर फोनवर 22,500 पर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. मात्र, लक्षात घ्या की एक्सचेंज ऑफरचे मूल्य फोनची कंपनी, मॉडेल आणि स्थिती योग्य असल्यावरच मिळेल. येथून खरेदी करा 

त्याबरोबरच, 12GB RAM + 256GB स्टोरेजसह OnePlus 10R चा टॉप-एंड व्हेरिएंट 38,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. हे कूपन डिस्काउंटसह 34,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. बँक कार्डसह, फोनची किंमत 32,999 रुपयांपर्यंत खाली येईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo