स्मार्टफोन ब्रँड Nothing चा आगामी फोन लवकरच लाँच केला जाईल. ब्रँड आपल्या युनिक ट्रांसपरंट डिझाईन साठी लोकप्रिय आहे. कंपनी लवकरच नवीन नथिंग फोन (2) स्मार्टफोन लाँच करणार आहे. मात्र, लाँच आधी कंपनीने भारतीयांना एक भेट दिली आहे. नथिंगने भारतात Nothing phone 2 स्मार्टफोन बनवणार असल्याची घोषणा केली आहे, अशी माहिती मिळाली आहे. आगामी फोन भारतातून शेजारील देशांमध्ये देखील निर्यात केला जाणार आहे, अशी देखील माहिती मिळाली आहे.
नथिंग फोन (2) स्मार्टफोन या वर्षी जुलैमध्ये लाँच केला जाणार असल्याचे वृत्त आहेत. मात्र, आगामी नथिंग फोन (2) कोणत्या तारखेला दाखल होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
काय मिळेल विशेष ?
हा फोन 6.7 इंच फुल HD+ डिस्प्ले सह येईल. विशेष म्हणजे हा फोन रिसायकल आणि बायो बेस्ड पार्ट्सपासून बनवला जाईल. Nothing Phone (2) जुन्या फोनपेक्षा म्हणजेच phone 1 पेक्षा दुप्पट वेगवान असेल.
तसेच, नव्या स्मार्टफोन मध्ये मोठी बॅटरी आणि डिस्प्ले दिला जाईल. त्याबरोबरच, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन जेन 1 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 4700mAh बॅटरी दिली जाऊ शकते. फोन 2 ते 3 वर्षांच्या अँड्रॉइड अपडेट्ससह ऑफर होणार आहे आणि 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स दिले जातील , अशी माहिती लीकनुसार मिळालेली आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile