Nothing Phone (1) 10 हजारांनी स्वस्त, बघा कुठे मिळतेय भारी ऑफर…

Nothing Phone (1) 10 हजारांनी स्वस्त, बघा कुठे मिळतेय भारी ऑफर…
HIGHLIGHTS

Nothing Phone (1) मोठ्या सवलतीसह उपलब्ध

Nothing Phone (1)ची वेगळ्या डिझाईनमुळे चर्चा

फ्लिपकार्टवर मिळतेय ही खास ऑफर

Nothing Phone (1) च्या अनोख्या डिझाईनची खूप चर्चा आहे. याच कारणामुळे अनेकांना हा स्मार्टफोन घ्यायचा आहे, मात्र जास्त किंमतीमुळे त्यांना या योजना बदलाव्या लागत आहेत. हा फोन तुम्ही आता डिस्काउंटसह खरेदी करू शकता. बघुयात हा फोन स्वस्तात कसा खरेदी करता येईल… 

हे सुद्धा वाचा : Vodafone-Idea कंपनी बंद होणार? बघा रिचार्ज प्लॅन्स का झाले गायब…

ऑफर्स : 

Flipkart वरून नथिंग फोन (1) सहज खरेदी करता येणार आहे. या फोनची MRP 39,999 रुपये आहे आणि तुम्ही 17% डिस्काउंटनंतर 32,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. फेडरल बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सवलत मिळू शकते. HSBC क्रेडिट कार्डवरही अशीच ऑफर सुरू आहे. फोनला कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी मिळत आहे.

स्पेसिफिकेशन्स : 

 हा फोन 8GB आणि 12GB रॅम पर्यायांसह येतो. आज ऑर्डर केल्यास, हा फोन 2 दिवसात वितरित केला जाईल. फोनमध्ये 6.55 इंच फुल HD + डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP वर उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त, आकर्षक सेल्फीसाठी यामध्ये तुम्हाला 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसरमुळे, तुम्हाला स्पीडबद्दल कोणतीही तक्रार असणार नाही. मात्र, हा फोन खरेदी करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे थोडे अधिक बजेट आवश्यक आहे.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo