Nothing आणत आहे नवा Affordable स्मार्टफोन CMF Phone (1), जाणून घ्या किती असेल किंमत? Tech News 

HIGHLIGHTS

Nothing चा सब-ब्रँड CMF आता स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत

Nothing CMF ब्रँड अंतर्गत परवडणारा स्मार्टफोन CMF Phone (1) लाँच करणार

हा फोन भारतीय बाजारात 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत असेल.

Nothing आणत आहे नवा Affordable स्मार्टफोन CMF Phone (1), जाणून घ्या किती असेल किंमत? Tech News 

Nothing चा सब-ब्रँड CMF आता स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली ओळख तयार करण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, कंपनी लवकरच आपला पहिला स्मार्टफोन CMF Phone (1) लाँच करेल, अशी शक्यता आहे. हा स्मार्टफोन परवडणाऱ्या किमतीत लाँच केला जाईल. त्याची किंमतही Nothing फोनपेक्षा कमी असेल, असे सांगितले जात आहे. या नव्या फोनबाबत अनेक लीक्स सोशल मीडियावर पुढे येत आहेत. नव्या लीकमध्ये फोनची किंमत आणि स्पेक्स उघड झाले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता CMF Phone (1) बद्दल नवे लीक्स बघुयात-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा: लोकप्रिय Disney+ Hotstar वर ‘या’ महिन्यात रिलीज होणार भारी चित्रपट आणि सिरीज, बघा यादी

Nothing CMF Phone (1) किंमत (लीक)

अलीकडेच लीक झालेल्या अहवालानुसार, Nothing CMF ब्रँड अंतर्गत परवडणारा स्मार्टफोन CMF Phone (1) लाँच करणार आहे. या रिपोर्टमध्ये फोनची किंमतही सांगण्यात आली आहे. हा फोन भारतीय बाजारात 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत आणला जाईल, असे बोलले जात आहे.

nothing CMF Phone (1) design
Credit: 91mobiles

ही किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त Nothing Phone (2a) पेक्षा खूपच कमी आहे. Nothing च्या या स्मार्टफोनची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन ऑरेंज, व्हाइट आणि ब्लॅक या तीन कलर ऑप्शनमध्ये आणला जाऊ शकतो.

Nothing CMF Phone (1)

लीकनुसार, CMF फोन (1) स्मार्टफोन प्लास्टिक बॉडीसह आणला जाऊ शकतो. हा फोन गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह असण्याची अपेक्षा आहे. आगामी स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच डिस्प्ले आणि सिंगल रियर कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. कंपनी या फोनमध्ये Mediatek Dimensity 5G चिपसेट देईल, असे देखल बोलले जात आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळू शकते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. लीकद्वारे फोनबद्दल सध्या एवढीच माहिती मिळाली आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, आत्तापर्यंत CMF ने फोनच्या लाँच डेट किंवा फीचर्सबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, कंपनी लवकरच फोनच्या लाँच आणि स्पेसिफिकेशन संदर्भात इतर घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo