Nokia चा नवीन फ्लॅगशिप फोन भारतात लाँच, किंमत आहे का तुमच्या बजेटमध्ये…

Nokia चा नवीन फ्लॅगशिप फोन भारतात लाँच, किंमत आहे का तुमच्या बजेटमध्ये…
HIGHLIGHTS

Nokia X30 5G फ्लॅगशिप फोन भारतात लाँच

फोनमध्ये 4200 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जला सपोर्ट करते.

कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त Amazon वर ग्राहकांसाठी या हँडसेटची बुकिंग सुरू झाली आहे.

Nokia X सीरीज अंतर्गत  स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. Nokia X30 5G नवीनतम नोकिया फोन AMOLED डिस्प्ले आणि 33W फास्ट चार्जिंग सुविधेसह स्नॅपड्रॅगन प्रोसेसर प्रदान करतो. चला तर जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि दमदार फीचर्स… 

हे सुद्धा वाचा : Oneplus 10 Pro च्या तुलनेत Oneplus 11 5G मध्ये किती बदल झाला ? वाचा डिटेल्स

Nokia X30 5G ची भारतीय किंमत

या नोकिया मोबाईल फोनच्या 8 GB रॅम / 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 48 हजार 999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या उपकरणाचे क्लाउडी ब्लू आणि आइस व्हाइट दोन कलर व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त Amazon वर ग्राहकांसाठी या हँडसेटची बुकिंग सुरू झाली आहे.

 या नोकिया फोनची विक्री 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होईल. Nokia X30 5G फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2,999 रुपये किमतीचा 33W फास्ट चार्जर दिला जाईल.

Nokia X30 5G स्पेसिफिकेशन्स : 

फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो फुल HD + रिझोल्यूशन ऑफर करतो. संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस वापरण्यात आला आहे, हा फोन 700 निट्सच्या पीक ब्राइटनेससह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Nokia X30 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

हा नोकिया मोबाईल Android 12 आणि Stock Android UI सह लाँच करण्यात आला आहे. या फोनला 3 वर्षांसाठी 3 OS अपग्रेड आणि मासिक सुरक्षा अपडेट मिळत राहतील. फोनमध्ये 4200 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जला सपोर्ट करते.

फोनच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.फोनमध्ये 5G, Wi-Fi, GPS, NFC, ब्लूटूथ आवृत्ती 5.1 आणि USB टाइप-सी पोर्टसह सुरक्षिततेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo