Nokia Flip Phone New Variants: नव्या अवतारात लाँच झाला स्वस्त फोन, मिळतायेत अप्रतिम फीचर्स

Nokia Flip Phone New Variants: नव्या अवतारात लाँच झाला स्वस्त फोन, मिळतायेत अप्रतिम फीचर्स
HIGHLIGHTS

Nokia ने Nokia 2660 फ्लिप फोन नवीन ट्विस्टसह सादर केला आहे.

फोल्डेबल नोकिया फोन Amazon India आणि Nokia.com वर विक्रीसाठी आणला जाईल.

बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर आठवडे चालण्यास सक्षम असल्याचाही दावा

HMD ग्लोबल बजेट स्मार्टफोन देण्यासाठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय कंपनी आहे. Nokia चे मोबाईल फोन्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता Nokia ने Nokia 2660 फ्लिप फोन नवीन ट्विस्टसह सादर केला आहे. कंपनीने हा फोन दोन नवीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिला आहे. तरुणांमध्ये या फोनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत होती, या पार्श्वभूमीवर हे मोठे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नोकिया ने आपला Nokia 2660 फ्लिप फोन पॉप पिंक आणि लश ग्रीन कलर मध्ये सादर केला आहे.

उपलब्धता आणि किंमत 

Nokia 2660 Flip फोन लवकरच पॉप पिंक आणि लश ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. फोल्डेबल नोकिया फोन Amazon India आणि Nokia.com वर विक्रीसाठी आणला जाईल. नवीन कलर 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. Amazon वर आणि अधिकृत साईटवर या फोनच्या व्हेरिएंट्सची किंमत 4,499 रुपये आहे. 

 Nokia 2660 Flip चे संपूर्ण तपशील 

नोकिया 2660 फ्लिप फोनमध्ये 2.8-इंच लांबीचा डिस्प्ले उपलब्ध आहे. हा डिस्प्ले स्क्रीन वाचण्यासाठी पुरेसा आहे. याशिवाय फोनमध्ये फ्रंट डिस्प्ले देखील आहे, जो नोटिफिकेशन्स दाखवण्याचे काम करतो, यामध्ये तुम्हाला इनकमिंग कॉल्सची देखील माहिती मिळेल. एकंदरीत तुम्हाला कमी बजेटमध्ये स्टायलिश फोन देण्यात काम कंपनीने केले आहे. 

याशिवाय, हा नोकिया फोल्डेबल फोन टिकाऊ क्लॅमशेल डिझाइनसह सादर करण्यात आला होता. यात लो-फाय रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर आठवडे चालण्यास सक्षम असल्याचाही दावा कंपनी करते. फोनमध्ये 1450mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जे ग्राहकांना आठवड्यांचा स्टँडबाय वेळ देण्यास सक्षम आहे.  यामध्ये ग्राहकांना SMS, कॉल आणि क्लासिक स्नेक गेमची सुविधा मिळणार आहे. 

फोनमध्ये टॅक्टिकल बटन्सही देण्यात आले आहेत. याशिवाय यात साउंड सेटिंगही आहे. फोनमध्ये तुमच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा काळजी घेण्यात आली आहे. नोकिया 2660 फ्लिप फोनमध्ये एक डेडिकेटेड इमर्जन्सी बटण देखील उपलब्ध आहे. जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता, तुम्ही एकाच वेळी सुमारे 5 संपर्कांना नोटिफाय करू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo