HIGHLIGHTS
नवीन बजेट स्मार्टफोन Nokia C22 लाँच
लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये
फोनची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर तीन दिवस टिकेल.
Nokia च्या बजेट रेंजमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सच्या यादीत आता आणखी एक नाव सामील झाले आहे. कंपनीने ग्राहकांसाठी नवीन बजेट स्मार्टफोन Nokia C22 लाँच केला आहे. उत्तम बॅटरी लाइफ, ड्युअल कॅमेरा सेटअप आणि लेटेस्ट अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टमसह हा लेटेस्ट नोकिया मोबाइल फोन लाँच करण्यात आला आहे.
SurveyNokia ने आपल्या लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये ठेवली आहे. हा फोन पर्पल, सँड आणि चारकोल या कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंच लांबीचा HD प्लस डिस्प्ले मिळणार आहे. Android 13 Go एडिशनवर चालणाऱ्या या फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी यामध्ये फेस अनलॉक फीचरसह मागील बाजूस फिंगरप्रिंट सेंसर उपलब्ध आहे.
फोनमध्ये 2GB वर्च्युअल रॅम सपोर्टसह 2GB रॅम आणि 2GB व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह 4GB रॅम तुम्हाला मिळेल. हे मॉडेल्स 64GB इंटर्नल स्टोरेजसह येतात आणि 256GB पर्यंत स्टोरेज ऑफर करतात.
Nokia C22 मध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर तीन दिवस टिकेल. ही बॅटरी टाइप-C चार्जिंग पोर्टद्वारे 10W चार्जिंगला सपोर्ट करेल. नोकिया फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. तर, 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile