जुने दिवस गेले? Nokia Mobile नव्हे तर HMD Global नावाने लाँच होणार नवीन फोन, टीझर Video रिलीज। Tech News 

HIGHLIGHTS

HMD Global स्वतःच्या 'HMD' ब्रँड अंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता

HMD ग्लोबलने सप्टेंबर 2023 मध्ये आपला HMD ब्रँड लाँच केला.

कंपनी आपला पहिला HMD-ब्रँडेड स्मार्टफोन MWC बार्सिलोना येथे लाँच करू शकते.

जुने दिवस गेले? Nokia Mobile नव्हे तर HMD Global नावाने लाँच होणार नवीन फोन, टीझर Video रिलीज। Tech News 

HMD Global कंपनी गेल्या 7 वर्षांपासून Nokia ब्रँडचे स्मार्टफोन बनवत होती. आता कंपनी Nokia ब्रँडिंग आपल्या उपकरणांमधून काढून आणि HMD ग्लोबल नावाने सादर करू शकते. कंपनीने आपल्या वेबसाइटचे नाव Nokia.com वरून HMD.com केले आहे. केवळ साइटच नाही तर कंपनीने आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे अधिकृत नाव देखील बदलले आहे. यासोबतच HMD कंपनीने आगामी डिवाइसेसला टीज करण्यास देखील सुरुवात केली आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!
Nokia hmd news

यावरून हे समजून येते की, कंपनी लवकरच HMD ग्लोबल नावाने एक नवीन डिव्हाइस बाजारात सादर करण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात फोनचे संपूर्ण तपशील-

हे सुद्धा वाचा: Airtel Xstream AirFiber New Plan: कंपनीने लाँच केला नवीन वार्षिक प्लॅन, Free इंस्टॉलेशन देखील उपलब्ध

काय म्हणाले कंपनीचे निर्माते?

Nokia स्मार्टफोन्सच्या निर्मात्या HMD ग्लोबलने सप्टेंबर 2023 मध्ये आपला HMD ब्रँड लाँच केला. त्यावेळी, कंपनीने नोकिया उपकरणांव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात HMD-ब्रँडेड मोबाइल उपकरणे लाँच करणार असल्याची घोषणा केली होती. नवीन उपकरणे लाँच करण्यासाठी नवीन भागीदारांसोबत पार्टनरशिप करणार असल्याचेही कंपनीने उघड केले आहे.

HMD घेऊन येणार नवीन फोन

आता कंपनीने जाहीर केले आहे की, ते अस्सल HMD उपकरणांसह आणखी काही ऑफर करण्याची तयारी करत आहे. कंपनीने ‘Nokia’ ब्रँड काढून टाकत असल्याचे नेमके सांगितले नसले तरी, डंब फोन, इअरबड्स आणि अगदी टॅब्लेटसह फोनची एक लाईनअप व्हिडिओ त्यांनी प्रदर्शित केला आहे; “We’re HMD, Human Mobile Devices” त्याबरोबरच, कंपनीची X ट्विटर ID @nokiamobiles ने बदलून @HMDglobal करण्यात आली आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स सोबत देखील समान प्रकरण आहे.

“ते अजूनही नोकिया फोनचे निर्माता आहेत,” असे कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले आहे. त्यामुळे भविष्यात आम्हाला काही नवीन नोकिया डंबफोन्स देखील दिसू शकतात. कंपनी अजूनही नोकिया फोन, टॅब्लेट आणि ॲक्सेसरीज विकत आहे आणि समर्थन देत राहील. परंतु कंपनी स्मार्टफोनसाठी स्वतःचे ब्रँडिंग वापरण्यास सुरुवात करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याबरोबरच, पहिले डिव्हाइस लवकरच रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

 upcoming HMD Global phones with hmd branding
HMD

कंपनी आपला पहिला HMD-ब्रँडेड स्मार्टफोन MWC बार्सिलोना येथे लाँच करू शकते, अशा अफवा देखील सुरु झाल्या आहेत. आगामी फोनच्या लाँच या महिन्याच्या शेवटी होणार आहे. कंपनीने ब्लु आणि पिंक कलरमध्ये एक नवीन फोन देखील टीज केला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo