अरे व्वा! Vivo V50 प्री-ऑर्डरवर मिळतील अप्रतिम बेनिफिट्स, जाणून घ्या काय मिळेल विशेष?
Vivo चा Vivo V50 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होणार
फोनसाठी प्री-रिझर्वेशन ऑफर 7 फेब्रुवारी 2025 पासून 16 फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत.
Vivo V50 चे प्री-रिझर्वेशन करणाऱ्या ग्राहकांना एक खास कॉम्बो ऑफर मिळत आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा Vivo V50 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होणार आहे. नवा फोन खरेदी करण्यासाठी इच्छुक ग्राहकांना हा फोन लाँच होण्यापूर्वीच कंपनी प्री-ऑर्डरवर अनेक फायदे ऑफर करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनसाठी प्री-रिझर्वेशन ऑफर 7 फेब्रुवारी 2025 पासून 16 फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत. हा स्मार्टफोन 17 फेब्रुवारी 2025 रोजी लाँच होईल. प्री-रिझर्वेशन करणाऱ्या ग्राहकांना अनेक आश्चर्यकारक ऑफर्स मिळत आहेत. जाणून घेऊयात सविस्तर-
Survey
Vivo V50 चे प्री-रिझर्वेशन
एका प्रसिद्ध प्रकाशकाच्या अहवालानुसार, Vivo V50 चे प्री-रिझर्वेशन करणाऱ्या ग्राहकांना एक खास कॉम्बो ऑफर मिळत आहे. यामध्ये 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी आणि 1 वर्षाची स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन प्लॅन (V-Shield) मोठ्या सवलतीसह मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, साधारणतः 30-40 हजार रुपयांच्या स्मार्टफोनसाठी प्रोटेक्शन प्लॅनची किंमत 4,698 रुपये असते आणि 40-50 हजार रुपयांच्या प्लॅनची किंमत 5,498 रुपये असते.
प्री-रिझर्वेशन ऑफरसह ग्राहकांना लोअर-टियर प्लॅनवर 80% आणि हाय-टियर प्लॅनवर 82% पर्यंत सूट मिळू शकते. यामुळे ऑफरची किंमत फक्त 999 रुपयांपर्यंत होईल. यामुळे खरेदीदारांना प्रत्यक्ष प्लॅनच्या किमतीत फक्त 20% रक्कम भरण्याची परवानगी मिळते. ही ऑफर आगामी Vivo V50 खरेदी करू इच्छित असणाऱ्या ग्राहकांसाठी खूप उपयुक्त आहे.
Vivo V50 चे अपेक्षित तपशील
आगामी Vivo V50 स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा क्वाड कर्व्ड डिस्प्ले असेल, ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1.5k असेल आणि रिफ्रेश रेट 120hz असेल. Vivo च्या या 5G फोनमध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध असेल. हा Vivo फोन 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह येईल. फोनमध्ये 6000mAh ची जंबो बॅटरी असेल.

या स्मार्टफोनची किंमत 40 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. Vivo V50 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. यात OIS सपोर्टसह 50MP मेन आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरचा समावेश आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 50MP कॅमेरा दिला जाईल. मात्र, आगामी स्मार्टफोनची किंमत आणि सर्व योग्य तपशील Vivo V50 लाँच झाल्यावरच पुढे येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile