प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola आपला आगामी स्मार्टफोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. Motorola चा आगामी स्मार्टफोन Motorola Edge 40 Neo उद्या म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी भारतात लॉन्च होणार आहे. अलीकडेच हा स्मार्टफोन युरोपमध्ये लाँच केला गेला. लाँच होण्यापूर्वी टिपस्टर अभिषेक यादवने Motorola Edge 40 Neo ची भारतात किंमत किती असेल हे उघड केले आहे. बघा सविस्तर.
प्रसिद्ध टिपस्टर अभिषेकच्या मते, Moto Edge 40 Neo ची भारतात किंमत 24,999 रुपये असेल. जर हे लीक खरे ठरे तर, हा स्मार्टफोन Edge सिरीजमधील सर्वात स्वस्त डिव्हाइस असेल. हा फोन खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह येणार आहे. बघुयात Motorola Edge 40 Neo चे अपेक्षित तपशील.
Motorola Edge 40 Neo चे अपेक्षित तपशील
Moto Edge 40 Neo मध्ये 6.55-इंच लांबीचा poOLED डिस्प्ले आहे, ज्याचे फुल HD प्लस रिझोल्यूशन 2400 × 1080 पिक्सेल, ज्याचे रिफ्रेश दर 144Hz आहे. फोनमध्ये Mali G610 GPU सह MediaTek Dimensity 7030 प्रोसेसर आहे.हा स्मार्टफोन Android 13 वर काम करतो आणि 14 आणि 15 चे अपडेट मिळतील. याशिवाय 3 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्सही मिळतील, अशी देखील अपेक्षा आहे. सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. या फोनमध्ये डॉल्बी ATMOS ऑडिओ आणि मोटो स्पेशियल साउंडसह स्टिरिओ स्पीकर देखील मिळू शकतात.
कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि मागील बाजूस 13MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तर, फोनचा फ्रंटमधून 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, Moto Edge 40 Neo मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 68W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile