भारीच की ! Moto X30 Pro हा 200MP कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन असेल

भारीच की ! Moto X30 Pro हा 200MP कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन असेल
HIGHLIGHTS

Moto X30 Pro 2 ऑगस्ट रोजी होणार लाँच

200MP कॅमेरा असलेला जगातील पहिला फोन

फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल

Moto X30 Pro 2 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे. लाँच अगोदर, मोटोरोलाने पुष्टी केली आहे की डिव्हाइस 200-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरासह सुसज्ज असेल. कंपनीने सोशल पोस्टद्वारे याची पुष्टी केली आहे. हा फोन Moto Razr 2022 सोबत लाँच केला जाईल.

हे सुद्धा वाचा : 6GB RAM सह Redmi 10A Sport स्मार्टफोन लाँच, फीचर्सही जबरदस्त आणि किंमतही कमी

लाँच अगोदर, कंपनीने Moto X30 Pro मध्ये असलेल्या काही खास फीचर्सची पुष्टी केली आहे. नवीन टीझरनुसार, Moto X30 Pro हा पहिला फोन असेल, जो 200-मेगापिक्सेल कॅमेराने सुसज्ज असेल. आतापर्यंत कॅमेरा मॉड्यूलबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु मोटोरोलाने पुष्टी केली आहे की, विशेषतः फोनला एक मॅसिव्ह कॅमेरा मिळेल.

याशिवाय, फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल आणि Moto X30 Pro ला 125W GaN फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.

moto x30 pro

MOTO X30 PRO मधील संभावित फीचर्स 

Moto X30 Pro मध्ये 6.67-इंच 144Hz कर्व स्क्रीन, 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा, 12MP 2x झूम पोर्ट्रेट कॅमेरा आणि 60MP सेल्फी कॅमेरा मिळेल. 8/12GB रॅम आणि 128/256GB स्टोरेजसह हे उपकरण स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपद्वारे समर्थित असेल. फोनमध्ये 4500mAh बॅटरी मिळेल, जी 125W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Moto X30 Pro या वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये सादर केला जाईल. तथापि, एज 30 अल्ट्रा देशात सादर केली जाईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo