अखेरीस भारतात लाँच झाला मोटो X फोर्स स्मार्टफोन

अखेरीस भारतात लाँच झाला मोटो X फोर्स स्मार्टफोन
HIGHLIGHTS

मोटोरोलाने भारतात आपला कधीही न तुटणारा शटरप्रूफ डिस्प्ले असलेला मोटो X फोर्स स्मार्टफोन लाँच केला. ह्या स्मार्टफोनला भारतात दोन प्रकारात लाँच केले गेले आहे.

मोटोरोलाने लाँच केलेल्या ह्या शटरप्रूफ डिस्प्ले स्मार्टफोनला दोन प्रकारात लाँच केले गेले आहे. ह्यातील मोटो X फोर्स 32GB प्रकाराची किंमत ४९,९०० रुपये आहे, तर 64GB प्रकाराची किंमत ५३,९९९ रुपये आहे. ह्या स्मार्टफोनला आपण ८ फेब्रुवारीपासून अॅमेझ़ॉनच्या माध्यमातून खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन आपण काळ्या, राखाडी आणि पांढ-या प्रकारात लाँच केला जाईल.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.4 इंचाची QHD 1440×2560 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे आणि कंपनीचा दावा आहे की, ह्याची डिस्प्ले Shatterproof आहे, ज्याला तोडले जाऊ शकत नाही. ह्याचाच अर्थ ह्या डिस्प्लेला कितीही उंचावरुन फेका, तो तुटणार नाही. ह्या डिस्प्लेला रिजिड कोरने बनवले आहे. हा फ्लेक्सिबल AMOLED स्क्रीन आणि ड्यूल लेयर टचस्क्रीन पॅनलने बनवली आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन वॉटर-रिपेलेंट नॅनो कोटिंगसह येतो.

स्मार्टफोनमध्ये क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन ८१० ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे, जो 2Ghz ची गती देतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 3GB ची LPDDR4 रॅम मिळत आहे. हा स्मार्टफोन आपल्याला 32GB आणि 64GB च्या प्रकारात मिळेल. आणि प्रकारांना मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो. स्मार्टफोनमध्ये 3760mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. आणि कंपनीचा दावा आहे की, स्मार्टफोनमध्ये दिली गेलेली बॅटरी मिक्स वापरल्यावरसुद्धा २ दिवसाचा बॅटरी बॅकअप देते आणि बॅटरी क्विक चार्जला सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.0 अॅपर्चरसह ड्यूल LED फ्लॅशसह मिळत आहे.स्मार्टफोनमध्ये फेज डिटेक्ट ऑटोफोकस, त्याशिवाय 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा f/2.0 अॅपर्चरसह लाँच झाला आहे.

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर चालतो. ह्या स्मार्टफोनमध्ये अॅनड्रॉईड ६.० मार्शमॅलो सपोर्ट नाही. हा फोन 4G LTE ला सपोर्ट करतो.

हेेदेखील वाचा- आता आनंद घ्या ‘Flipkart Big Exchange Days’ ऑफर्सचा

हेदेखील पाहा – मोठी स्क्रीन असलेले भारतातील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्स

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo