Moto Razr 2022: 50MP कॅमेरा आणि 12GB RAM असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Moto Razr 2022: 50MP कॅमेरा आणि 12GB RAM असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
HIGHLIGHTS

Moto Razr 2022 लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन

स्मार्टफोनची सुरुवातीची किमंत सुमारे 70,750 रुपये

यात 3,500mAh बॅटरी आहे आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Moto Razr 2022 कंपनीचा लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन म्हणून गुरुवारी चीनमध्ये लाँच करण्यात आला. नवीन Motorola स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप Snapdragon 8+ Gen 1 SoC देण्यात आला आहे. यात 144Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे. यात लहान बाह्य डिस्प्ले आणि 3,500mAh बॅटरीसह 50-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित MyUI 4.0 वर काम करतो. Samsung Galaxy Z Flip 4 च्या ग्लोबल लाँचनंतर Motorola चा फोल्डेबल स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : Vodafone Idea चा हा जबरदस्त प्लॅन 365 दिवस चालतो, मिळेल दररोज 2GB डेटा आणि कॉलिंग

Moto Razr 2022 

 Moto Razr 2022 मध्ये टॉप सेंटर कटआउटसह 6.7-इंच लांबीचा फोल्डेबल OLED होल पंच मेन डिस्प्ले आहे. हे 144Hz रिफ्रेश रेट, 10-बिट कलर सपोर्ट, HDR10+ आणि DC डिमिंगसह सुसज्ज आहे. यात 2.7-इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे, ज्याला नोटिफिकेशन ऍक्सेस, चेक वेदर आणि इतर फीचर्स देण्यात आली आहेत. त्याबरोबरच, यात Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoC देण्यात आला आहे. तसेच, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आले आहे. 

moto razr 2022

फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. त्याबरोबरच, या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G, Wi-Fi 6E, ब्लूटूथ आणि USB टाइप C पोर्ट आहे. त्याबरोबरच, यात 3,500mAh बॅटरी आहे आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Moto Razr 2022 किंमत आणि उपलब्धता

 Moto Razr 2022 ची किंमत CNY 5,999 आहे म्हणजेच 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी सुमारे 70,750 रुपये आहे. तर, त्याच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 6,499 म्हणजेच 76,650 रुपये आहे. याशिवाय, 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 7,299 आहे, म्हणजे सुमारे 86,000 रुपये. Motoचा हा फोन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. मात्र, हा फोन इतर बाजारात कधी उपलब्ध होईल याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo