त्वरा करा ! Moto च्या दमदार फोनची पहिली विक्री आज, मिळतेय हजारो रुपयांची भारी सवलत

त्वरा करा ! Moto च्या दमदार फोनची पहिली विक्री आज, मिळतेय हजारो रुपयांची भारी सवलत
HIGHLIGHTS

Moto G82 5G स्मार्टफोनची पहिली विक्री आज

स्मार्टफोनची किंमत 21,499 रुपये

पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स उपलब्ध

Motorola ने अलीकडेच भारतात आपला नवीन स्मार्टफोन Moto G82 5G लाँच केला आहे. फोनमध्ये 120Hz डिस्प्ले, 50-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. आज 14 जून रोजी या फोनची पहिली विक्री होणार आहे. ग्राहक दुपारी 12 वाजता ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. फोनची किंमत 21,499 रुपये आहे, परंतु पहिल्या सेलमध्ये तुम्हाला अनेक ऑफर्ससह हा फोन खरेदी करता येणार आहे. 

किंमत आणि ऑफर

Moto G82 5G ची विक्री 14 जून रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरू होईल. फोनची सुरुवातीची किंमत 21,499 रुपये आहे. परंतु, SBI क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 1500 रुपयांच्या त्वरित सवलतीनंतर फोन 19,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय, ग्राहकांना त्यांच्या जुन्या डिव्हाइच्या बदल्यात 12,500 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते.
 

हे सुद्धा वाचा : Xiaomi ने कमी केली फिटनेस बँडची किंमत, 14 दिवसांच्या बॅटरी लाइफसह मिळतात जबरदस्त हेल्थ फीचर्स

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि POLED स्क्रीनला सपोर्ट करतो. यात 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर आहे. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Moto G82 5G मध्ये 50MP, 8MP, 2MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप एका LED फ्लॅशसह आहे. OIS सह 50MP कॅमेरा f/1.8 अपर्चर आहे. रियर कॅमेरा HDR, नाईट व्हिजन, प्रो मोड, 50M हाय रिझोल्यूशन मोड, फोटो सॉलिड, ड्युअल कॅमेरा बोकेह, सुपर रिझोल्यूशन, गुगल लेन्स इंटिग्रेशन, सुपर नाईट सेल्फी आणि व्हिडिओ स्टॅबिलायझरसह इतर अनेक फीचर्सना सपोर्ट करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo