मोटो G (जेन 3) स्मार्टफोनचा 8GB मॉडल ९,९९९ रुपयात मिळत आहे, ह्याची आधीची किंमत ११,९९९ रुपये होती. तर मोटो G (जेन ३) स्मार्टफोनचा 16GB चा मॉडल आता १०,९९९ रुपयांत मिळत आहे.
मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाने आपले स्मार्टफोन्स मोटो G टर्बो एडिशन आणि मोटो G (जेन ३) च्या किंमतीत घट केली आहे. दोन्हीही स्मार्टफोन्स आधीप्रमाणे एक्सक्लूसिव फ्लिपकार्टवर मिळत आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
किंमतीत घट केल्यानंतर आता मोटोरोला मोटो G टर्बो एडिशन स्मार्टफोन १२,४९९ रुपयाच्या किंमतीत मिळत आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनला १४,४९९ रुपयात लाँच केले होते.
मोटो G (जेन 3) स्मार्टफोनचा 8GB मॉडल ९,९९९ रुपयात मिळत आहे, ह्याची आधीची किंमत ११,९९९ रुपये होती. तर मोटो G (जेन ३) स्मार्टफोनचा 16GB चा मॉडल आता १०,९९९ रुपयांत मिळत आहे. ह्याची आधीची किंमत १२,९९९ रुपये होती. मागील वर्षी जुलै महिन्यात लाँच केल्या गेलेल्या मोटो G (जेन ३) मध्ये करण्यात आलेली ही पहिली घट आहे. ह्या दरम्यान मोटोरोलाने अनेकदा मोटो (जेन ३) स्वस्तात विकले, मात्र हे पहिल्यांदा घडत आहे, जेथे हा स्मार्टफोन अशा सूटसह उपलब्ध केला गेला आहे.
त्याचबरोबर कंपनी आपल्या ह्या दोन स्मार्टफोन्सवर एक्सचेंज ऑफरसुद्धा देत आहे.ह्या एक्सचेंज ऑफरच्या अंतर्गत मोटो G (जेन ३) वर ४००० रुपयात आणि मोटो G टर्बो एडिशन ५,००० रुपयांची सूट देत आहे.