Moto E5 Plus स्मार्टफोन आज होणार आहे लॉन्च, इथे बघा या इवेंट ची लाइव स्ट्रीमिंग

Updated on 10-Jul-2018
HIGHLIGHTS

Moto E5 Plus स्मार्टफोन आज भारतात लॉन्च केला जाणार आहे, या डिवाइस बद्दल काही माहिती लीक्स मधून समोर आली आहे. या डिवाइस चा लॉन्च इवेंट दुपारी 3 वाजल्यापासून लाइव बघता येईल.

Moto E5 Plus to Launch Today in India here you can Watch the Live Sreaming of the Device: Motorola India आज भारतात आपला एक बजेट स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, हा डिवाइस भारतात Moto E5 Plus च्या रुपात लॉन्च केला जाईल. या डिवाइस चा लॉन्च नवी दिल्ली मध्ये दुपारी 3 वाजता सुरू होईल, हा इवेंट तुम्ही लाइव तुमच्या फोन वरून बघू शकता. 

हा स्मार्टफोन त्या स्मार्टफोंस यूजर्स साठी लॉन्च केला जात आहे, जे एक बजेट स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित आहेत. हि सीरीज Moto G सीरीज च्या खालील सीरीज आहे. या डिवाइस च्या जोरावर कंपनी Xiaomi आणि अन्य स्मार्टफोंस कंपन्यांना या बजेट मध्ये टक्कर देण्याचा विचार करत आहे. हा डिवाइस अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिवली लॉन्च केला जाणार आहे. तसेच देशभरातून तुम्ही हा डिवाइस Moto Hubs च्या माध्यमातून विकत घेऊ शकता. 

लँडिंग पेज वरून मिळालेली माहिती पाहता असे बोलू शकतो की हा डिवाइस दोन वेगवेगळ्या कलर वेरिएंट्स म्हणजे Fine Gold, आणि Black रंगांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी कडून याच्या किंमती बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही, पण असे बोलले जात आहे की हा डिवाइस कंपनी कडून Rs 7,000 ते Rs 11,000 च्या दरम्यानच्या किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. 

जर तुम्हाला या इवेंट ची लाइव स्ट्रीमिंग बघायची असेल तर, कंपनी आपल्या सोशल मीडिया हँडल्स वरून हा इवेंट लाइव दाखवणार आहे. तुम्ही ही लाइव स्ट्रीमिंग सहज कंपनी च्या फेसबुक पेज वर जाऊन बघू शकता किंवा मग तुम्ही कंपनी च्या यूट्यूब चॅनल वर जाऊन पण ही लाइव स्ट्रीमिंग बघू शकता.
 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :