मायक्रोमॅक्स कॅनवास नायट्रो 3 स्मार्टफोन कंपनीच्या साइटवर लिस्ट

मायक्रोमॅक्स कॅनवास नायट्रो 3 स्मार्टफोन कंपनीच्या साइटवर लिस्ट
HIGHLIGHTS

ह्यात 1.4GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक(MT6592M) प्रोसेसर आणि 2GB रॅमसुद्धा दिले आहे. हा स्मार्टफोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवता येऊ शकतो.

मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सचा नवीन स्मार्टफोन कॅनवास नायट्रो 3 ला कंपनीच्या अधिकृत साइटवर लिस्ट केले गेले आहे. सध्यातरी कंपनीकडून ह्या स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

 

त्याचबरोबर मायक्रोमॅक्स कॅनवास नायट्रो 3 स्मार्टफोनला एक तिस-या पार्टीच्या ऑनलाइन रिटेल वेबसाइटवर 8,130 रुपयाच्या किंमतीत लिस्ट केले गेले आहे.

मायक्रोमॅक्स कॅनवास नायट्रो 3 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा कॉर्निंग गोरिला ग्लान 3 ने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात 1.4GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक(MT6592) प्रोसेसर आणि 2GB रॅमसुद्धा आहे. हा स्मार्टफोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. मायक्रोमॅक्स कॅनवास नायट्रो 3 (ई532) हँडसेट अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो आणि हा एक ड्युल सिम (GSM+GSM) डिवाइस आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असू शकतो. दोन्ही कॅमेरे फ्लॅश सपोर्टसह येतात. हा स्मार्टफोन 2500mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 3G(HSPA+), वायफाय 802.11 B/G/N, ब्लूटुथ 4.0, मायक्रो-USB 2.0, GPS/A-GPS आणि 3.5mm ऑडियो जॅक फीचर आहे. हँडसेटमध्ये 4G कनेक्टिव्हिटी नाही. ह्या स्मार्टफोनचे परिमाण 144.3x72x8.7mm आहे. हा हँडसेट एक्सलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसरसह येईल.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo