4GB रॅमने सुसज्ज आहे मिजू प्रो 6 स्मार्टफोन

Updated on 13-Apr-2016
HIGHLIGHTS

मिजू प्रो 6 स्मार्टफोनमध्ये 21.1 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा फेज डिटेक्शन ऑटोफोकस (PDAF)ने सुसज्ज आहे. ह्या कॅमे-याची खास गोष्ट म्हणजे ह्यात 10LED ड्यूल टोन फ्लॅशसह सादर केले आहे.

मोबाईल निर्माता कंपनी मिजूने बाजारात आपला नवीन फोन प्रो 6 लाँच केला आहे. मिजू प्रो 6 स्मार्टफोन २३ एप्रिलपासून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंपनीने आपल्या ह्या फोनला दोन स्टोरेज व्हर्जनमध्ये सादर केले आहे. ह्याच्या 32GB व्हर्जनची किंमत 2500 चीनी युआन(जवळपास २५,७०२ रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 64GB व्हर्जनची किंमत 2800 चीनी युआन (जवळपास २८,७८६ रुपये) आहे.

 

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1080 पिक्सेल आहे. ही डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लासने संरक्षित आहे. ही डिस्प्ले 3D प्रेस फीचरने सुसज्ज आहे. हे तंत्रज्ञान अॅप्पलच्या 3D टच फीचर सारखेच आहे. फोन मिडियाटेक हेलिओ X25 प्रोसेसर आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. फोनमध्ये माली-T880 GPU सुद्धा दिला गेला आहे.

हेदेखील वाचा – करिअरविषयक मार्गदर्शन करणारे महत्त्वपुर्ण अॅप्स

मिजू प्रो 6 स्मार्टफोनमध्ये 21.1 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा फेज डिटेक्शन ऑटोफोकस (PDAF)ने सुसज्ज आहे. ह्या कॅमे-याची खास गोष्ट म्हणजे ह्यात 10 LED ड्यूल टोन फ्लॅशसह सादर केले आहे.  फोनमध्ये 2560mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन मूनलाइट, सिल्वर, शॅम्पेन गोल्ड, ब्लॅक. स्काय, बोल्ड अँड रेडिकल रंगात उपलब्ध होईल.

हेदेखील वाचा – भारतात लाँच झाला सोनी A68 A-Mount DSLR, किंमत ५५,९९० रुपये

हेदेखील वाचा – भारतातील कॉर्पोरेट्स क्षेत्राला भाड्यावर घेता येईल अॅप्पल आयफोन SE, भाडे ९९९ रुपये प्रति महिना

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :