MWC 2016 – लाँच झाला LG G5 स्मार्टफोन

MWC 2016 – लाँच झाला LG G5 स्मार्टफोन
HIGHLIGHTS

आतापर्यंतचा सर्वात चांगला अशा क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह लाँच झाला LG G5 स्मार्टफोन. गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक लोक ह्या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत होते.

स्पेन येथे बार्सिलोनामध्ये चालू असलेल्या MWC 2016 मध्ये LG ने आपला सर्वात आकर्षक असा फ्लॅगशिप स्मार्टफोन LG G5 लाँच केला. ह्या स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट असे क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर दिले आहे. ह्या स्मार्टफोनची अनेक लोक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते.

 

 

ह्या स्मार्टफोनच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनला एका खास डिझाईनसह लाँच केले आहे. ह्या स्मार्टफोनला मेटल बॉडीसह स्लीक डिझाईनसह बाजारात आणले आहे. त्याशिवाय ह्यात स्लाइड आउट रिमूव्हेबल बॅटरी दिली गेली आहे, ज्याने ह्या स्मार्टफोनच्या बॅटरीला एका स्लायडरप्रमाणे बाहेर काढू शकतो. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये १३५ डिग्री वाइड अँगल्स लेन्स दिले आहे, ज्याच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट फोटो काढू शकता.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.3 इंचाची क्वाड-कोर HD IPS क्वांटम डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे पिक्सेल रिझोल्युशन 2560×1440/554ppi आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 4GB ची LPDDR4 रॅम दिली गेली आहे स्मार्टफोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 2TB पर्यंत वाढवू शकतो.

ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 16 मेगापिक्सेलचा रियर आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोसह बाजारात आणला आहे. ह्यात 2800mAh ची बॅटरी दिली गेली आहे. तसेच ह्यात LTE/3G/2G सपोर्टसुद्धा आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय 8/0.211/a/b/g/n/ac/USB टाइप-co (3.0 compatible) सह NFC, ब्लुटूथ ४.२ दिला गेला आहे.  

हेदेखील वाचा- लावा आयरिश अॅटम 2X आणि ओप्पो जॉय प्लस यांची तुलना

हेदेखील पाहा- बाजारात आलेले 5 नवीन स्मार्टफोन्स

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo