२१ फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो एलजी G5 स्मार्टफोन

२१ फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो एलजी G5 स्मार्टफोन
HIGHLIGHTS

मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २२ फेब्रुवारीपासून सुरु होऊन २५ फेब्रुवारीपर्यंत चालेल. २२ फेब्रुवारीपासून सरु होणा-या ह्या मोबाईल वर्ल्ड कॉँग्रेसच्या एक दिवस आधी २१ फेब्रुवारीला एलजी ने एक कॉन्फरन्स ठेवली आहे, ज्यासाठी कंपनीद्वारा प्रेस निमंत्रणसुद्धा पाठवले जात आहे.

मोबाईल निर्माता कंपनी एलजी लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन G5 सादर करु शकते. आतापर्यंत ह्या स्मार्टफोनविषयी बरीच माहिती समोर आली आहे. सध्यातरी मिळालेल्या ताज्या बातमीनुसार, एलजी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या एक दिवस आधी आपला नवीन स्मार्टफोन G5 सादर करु शकतो.

 

मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २२ फेब्रुवारीपासून सुरु होऊन २५ फेब्रुवारीपर्यंत चालेल. २२ फेब्रुवारीपासून सरु होणा-या ह्या मोबाईल वर्ल्ड कॉँग्रेसच्या एक दिवस आधी २१ फेब्रुवारीला एलजी ने एक कॉन्फरन्स ठेवली आहे, ज्यासाठी कंपनीद्वारा प्रेस निमंत्रणसुद्धा पाठवले जात आहे. तथापि, कंपनीद्वारा पाठवलेल्या प्रेस निमंत्रणात कोणत्याही डिवाइसविषयी माहिती दिली गेलेली नाही. मात्र आशा आहे की. कंपनी ह्या कार्यक्रमात आपला नवीन डिवाइस एलजी G5 प्रदर्शित करु शकतो.

एलजीने जो मिडिया इनव्हाइट पाठवले आहे, त्यात एक म्यूजिक बॉक्स दाखवला आहे, त्याबर प्ले असे लिहिले आहे. ह्या निमंत्रणाला पाहून अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, कंपनी एमडब्ल्यूसीमध्ये म्यूजिक सेवेशी जोडलेल्या कोणत्याही डिवाइस किंवा फोनच्या स्टिरियो स्पीकरचे प्रदर्शन करु शकते.

ह्याआधी ह्या स्मार्टफोनबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. मागे दिल्या गेलेल्या काही लीक्सनुसार, एलजी G5 स्मार्टफोनमध्ये 5. 5 इंचाची 2K HD डिस्प्ले दिली गेली आहे, जी कोर्निंग गोरिल्ला ग्लासने सुरक्षित असेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.8GHz स्नॅपड्रॅगन 808 सह कोर्टेस A57 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज असेल. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा असेल, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.

त्याशिवाय ह्यात १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला असेल.

ह्याच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, NFC, GPS आणि ब्लूटुथसारखे फीचर्स असतील. तर पॉवर बॅकअपसाठी 3000mAhची बॅटरीसुद्धा असू शकते.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo