ह्या मार्शमॅलो ६.० चे वैशिष्ट्य हे आहे की, ह्यात सॅमसंग पे आणि अॅप्पल पे सारखी गुगलद्वारा अॅनड्रॉईड सेवा सुरु केली आहे. अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम मार्शमॅलो ६.० काही नवीन वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे.
मोबाईल निर्माता कंपनी एलजीने घोषणा केली आहे की, त्याच्या स्मार्टफोन G4 मध्ये हल्लीच लाँच केलेेला अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम ६.० मार्शमॅलोचे अपडेट मिळेल. एलजी G4 कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यात हे अपडेट मिळेल. सर्वात आधी म्हणजेच पुढील आठवड्यात G4 मध्ये मार्शमॅलो अपग्रेडची सुरुवात युरोप, आशिया आणि अमेरिकेपासून केली जाईल.
सेन फ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान नवीन ऑपरेटिंग सिस्टम मार्शमॅलो ६.० ला लाँच केले आहे. आता हा ऑपरेटिंग सिस्टम वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाला आहे. अॅनड्रॉईडच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम ६.० मार्शमॅलोचा वापर हा ग्राहकांसाठी एक वेगळा अनुभव असेल. ह्या मार्शमॅलो ६.० चे वैशिष्ट्य म्हणजे ह्यात सॅमसंग पे आणि अॅप्पल पे सारखी गुगलद्वारा अॅनड्रॉईड सेवा सुरु केली आहे. अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम मार्शमॅलो ६.० काही नविन वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. ह्यात फिंगरप्रिंट सुरक्षा आणि USB टाइप-C व्यतिरिक्त डायरेक्ट शेअर करण्याची सुविधा उपलब्ध होईल.
एलजी G4 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यंविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन २५६०x१४४० पिक्सेल आहे. हा गोरिला ग्लास ४ने कोटेड आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये १.८GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०८ चिपसेट, ३जीबी ची रॅम आणि ३२ जीबी अंतर्गत स्टोरेज आहे. ह्यात ३०००mAh ची बॅटरीसुद्धा दिली गेली आहे.