बहूचर्चित असलेला लिनोवो वाइब X3 अखेरीस लाँच

बहूचर्चित असलेला लिनोवो वाइब X3 अखेरीस लाँच
HIGHLIGHTS

सर्वांना प्रदीर्घ काळापासून ह्या स्मार्टफोनची प्रतिक्षा होती. अखेरीस हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. लिनोवो वाइब X3 मध्ये 5.5 इंचाच्या डिस्प्लेसह फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे.

जसे की लिनोवोने सर्वांना सांगितले होते की, तो सोमवारी आपला बहूप्रतिक्षित स्मार्टफोन लिनोवो वाइब X3 लाँच करेल,त्याप्रमाणे तो अखेरीस लाँच झालाय. मात्र हा फक्त चीनमध्येच लाँच करण्यात आलाय. ह्या स्मार्टफोनला दोन प्रकारात लाँच केले आहे. त्यात 32GB ची किंमत CNY 2,499 म्हणजेच जवळपास 26,000रुपये आहे, तर सामान्य स्मार्टफोनची किंमत CNY 1,899 म्हणजे जवळपास 19,500 रुपये आहे. त्याचबरोबर कंपनीने स्मार्टफोनच्या सर्वोत्कृष्ट प्रकारचीही घोषणा केलीय ज्याची किंमत CNY 2999 म्हणजे 31,000 रुपये आहे आणि त्याची स्टोरेज क्षमता 64GB आहे.

 

चीनमध्ये हा स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठीसुद्धा उपलब्ध केला गेला आहे. मात्र  त्याबद्दल कंपनीने अजून काही सांगितले नाही. तसेच ह्या स्मार्टफोनला कंपनी चीनच्या बाहेर लाँच करणार की नाही याबाबतही काही अधिकृत माहिती दिलेली नाही.

स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाची 1080×1920 पिक्सेल डिस्प्ले गोरिल्ला ग्लास ३ने संरक्षित मिळत आहे. त्याचबरोबर ह्याच्या दोन्ही कॅमे-याखाली फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. दोन्ही प्रकारांत हायब्रिड ड्यूल सिम स्लॉटसुद्धा दिले आहेत. ज्याचा अर्थ आहे की, ह्यात एक सिम स्लॉटमध्ये डिम आणि दुस-यात मायक्रोएसडी कार्ड आणि सिम असे दोघांचाही प्रयोग केला जाऊ शकतो. त्याचबरोबर दोन्ही 4G LTE सपोर्टसह बाजारात आले आहेत.

वाइब X3 स्मार्टफोनमध्ये हेक्सा-कोर, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर आणि 3GB ची रॅम दिली गेली आहे, तर यूथ प्रकारात 1.3GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 2GB रॅम दिली गेली आहे.

स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी २१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सोनी IMX230 सेंसर, LED फ्लॅश, PDPF(phase detection), आणि 4K व्हिडियो रेकॉर्डिंग सपोर्टसह दिला गेला आहे. त्याशिवाय ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. तर यूथ प्रकारात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये आपल्याला 3600mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo