आयफोन 7 प्लसमध्ये असू शकतो स्मार्ट कनेक्टर आणि ड्यूल कॅमेरा

HIGHLIGHTS

आयफोन 7 प्लसच्या केसला पाहून असे वाटतय की, ह्यात 3 पिन स्मार्ट कनेक्टर असेल, जसे आयपॅड प्रो मध्ये पाहिले गेले होते.

आयफोन 7 प्लसमध्ये  असू शकतो स्मार्ट कनेक्टर आणि ड्यूल कॅमेरा

अॅप्पल लवकरच बाजारात आपले दोन नवीन फोन आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लाँच करेल. मागील अनेक दिवसांपासून ह्या दोन्ही फोन्सविषयी अनेक लीक्स समोर येत आहेत. आणि आता ताज्या रिपोर्टनुसार, आयफोन 7 प्लस स्मार्टफोनचे डिझाईन समोर आले आहे. 9to5Mac च्या एका रिपोर्ट असा दावा केला आहे की, आयफोन 7 प्लसच्या केसला पाहून असेच वाटत आहे की, ह्यात 3 पिन स्मार्ट कनेक्टर असेल, जसे आयपॅड प्रोमध्ये पाहिले गेले होते. ह्याच्या माध्यमातून डाटा आणि पॉवर ट्रान्सफर केली जाऊ शकते.
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

तसे आयपॅड प्रोमध्ये असलेल्या स्मार्ट कनेक्टरद्वारा किबोर्ड आणि अनेक प्रकारचे डॉक्सला कनेक्ट केले जाते. आयपॅड प्रो च्या तुलनेत आयफोन 7 प्लस खूपच छोटा डिवाइस आहे. ह्यात वायरलेस चार्जिंग असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेदेखील पाहा – …तर असा आहे जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन

ह्याआधी समोर आलेल्या लीक्सनुसार, आयफोन 7 प्लस स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम आणि ड्यूल कॅमेरा इमेजिंग सिस्टम असेल, जो SLR ची फोटो क्वालिटी देईल.

हेदेखील वाचा – महिंद्रा eVerito इलेक्ट्रिक कार भारतात लाँच, किंमत ९.५० लाखांपासून सुरु
हेदेखील वाचा – planar magnetic टेक्नॉलॉजीसह येणारा जगातील पहिला हेडफोन लाँच

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo