आगामी Lava Yuva 5G फोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म! किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी? Tech News

आगामी Lava Yuva 5G फोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म! किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी? Tech News
HIGHLIGHTS

Lava Yuva 5G फोनची भारतीय लाँच तारीख कन्फर्म

Lava Yuva 5G फोनच्या लाँच डेटबद्दल ट्विटरवर दिली माहिती

कंपनीने Lava Yuva 5G चा टीझर व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

देशी स्मार्टफोन निर्माता कंपनीच्या आगामी Lava Yuva 5G फोनच्या लाँचची चर्चा सुरु होत्या. दरम्यान, कंपनीने नुकतेच फोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म केली आहे. नवीन Lava स्मार्टफोन Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याबरोबरच, फोनसाठी Lava Yuva 5G फोनची समर्पित मायक्रोसाइट Amazon वर लाईव्ह केली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Lava Yuva 5G चे लॉन्चिंग डिटेल्स-

Also Read: Its Here! Samsung Galaxy F55 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत? Tech News

Lava Yuva 5G फोनचे लॉन्चिंग डिटेल्स

Lava India ने त्याच्या अधिकृत X (Twitter) हँडलवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टद्वारे Lava Yuva 5G स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म करण्यात आली आहे. हा फोन भारतात 30 मे रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. एवढेच नाही तर, यासह कंपनीने फोनचा टीझर व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या टीझर व्हिडीओमध्ये फोनचे डिझाईन पाहिले जाऊ शकते.

Lava Yuva 5G चे डिझाईन

वरील टिझर व्हीडिओनुसार, डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास फोनच्या मागील बाजूस एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये 50MP AI कॅमेऱ्याबद्दल माहिती दिली आहे. सेल्फी कॅमेरासाठी फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच-होल कटआउट देण्यात आला आहे. त्यानंतर फोनच्या बॉटमला सिम कार्ड ट्रे, USB टाइप-C पोर्ट, स्पीकर ग्रिल इ. आहेत. हा फोन ग्रीन आणि ब्लु या दोन कलर ऑप्शन्समध्ये दिसत आहे.

Lava Yuva 5G चे लीक्स

ताज्या लीकनुसार, Lava Yuva 5G ची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. उत्तम कार्यक्षमतेसाठी, हा फोन MediaTek Dimensity 6080 किंवा Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. हा फोन 5000mAh बॅटरीला सपोर्ट करण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo